मुंबई

एचपीव्ही लसीकरण व क्रॅश कोर्सबाबत मुख्याध्यापकांची सभा

CD

मुख्याध्यापकांना एचपीव्ही लसीकरणाची माहिती

कासा, ता. १६ (बातमीदार) : डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत एचपीव्ही लसीकरण व क्रॅश कोर्स संदर्भात शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांची महत्त्वपूर्ण सभा उपविभागीय कार्यालय, डहाणू येथील सभागृहात बुधवारी (ता. १५) पार पडली. या सभेस डहाणू, तलासरी, पालघर व वसई तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक तसेच स्त्री अधीक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सभेत आश्रमशाळांमधील १४ ते १५ वर्ष वयोगटातील विद्यार्थिनींमध्ये एचपीव्ही लसीकरणाची सद्यःस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. किती विद्यार्थिनींना लस देण्यात आली आहे, किती विद्यार्थिनी लसीकरणापासून वंचित आहेत तसेच त्यामागील कारणांची माहिती सादर करण्यात आली.

याशिवाय, क्रॅश कोर्ससंदर्भात डहाणू व तलासरी तालुक्यातील शासकीय व अनुदानित माध्यमिक आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली. तसेच १८ शासकीय माध्यमिक आश्रमशाळांमधील अनुभवी माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांनाही या बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. सभेला तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या वेळी प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी एचपीव्ही लसीकरणाबाबत समाजात पसरलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज अधोरेखित केली. पालक व विद्यार्थ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवून लसीकरणाबाबत जागरूकता वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी स्नेहल चव्हाण (पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट), डॉ. तन्वीर शेख (तालुका वैद्यकीय अधिकारी, पालघर), डॉ. श्रीकांत कुलकर्णी (तालुका वैद्यकीय अधिकारी, तलासरी) तसेच डहाणू येथील वैद्यकीय अधिकारी डॉ ऋग्वेद दुधाट यांनी मार्गदर्शन करत विविध शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. बन्सीलाल पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT