मुंबई

मतदारयाद्यांच्या मोहिमेसाठी सहकार्याचे आवाहन

CD

तुर्भे, ता. १६ (बातमीदार) : मतदार याद्या अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी निवडणूक यंत्रणेकडून विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सिडको प्रशासनाने गृहनिर्माण संस्थांना सहकार्याचे आवाहन केले आहे. सिडकोचे उपनिबंधक प्रताप पाटील यांनी संस्थांच्या अध्यक्ष, सचिव व पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मतदार माहिती संकलनासाठी आयोजित शिबिरांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. शिबिरांना सहकार्य न केल्यास मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लवकरच मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण सुरू होणार असून, त्याआधी मतदारांची माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचे नाव, पत्ता, तसेच कुटुंबीयांशी असलेले नाते यांची अचूक नोंद करण्यावर भर दिला जात आहे. जुनी व सध्याची माहिती यामधील तफावत दूर करून मतदार यादी अधिक विश्वासार्ह बनविण्याचा उद्देश आहे.

ऐरोली मतदारसंघात २४ एप्रिलपर्यंत गृहनिर्माण संस्थांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून प्रत्यक्ष माहिती संकलन करत आहेत. छायाचित्रे अस्पष्ट असणे, अपूर्ण माहिती किंवा पुनरावृत्ती नोंदी अशा त्रुटींची तपासणी करून दुरुस्ती केली जात आहे.

बेलापूर मतदारसंघातही याच अनुषंगाने ‘मॅपिंग’ प्रक्रिया राबविण्यात येत असून, सोसायटी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून घरभेटीद्वारे माहिती पडताळणी केली जात आहे. दोन्ही मतदारसंघांत निवडणूक यंत्रणा व स्थानिक प्रशासन समन्वयाने काम करत असून, मतदारांच्या नोंदी अधिक अचूक करण्यावर भर दिला जात आहे. या प्रक्रियेत गृहनिर्माण संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सिडको प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

Pali News : प्रवाशांचे हाल थांबणार! सर्व अडथळे दूर करत रोहा-पुणे एसटी अखेर बसस्थानकात दाखल

Who is Navnita Gautam? विराट कोहली, स्मृती मानधना यांना 'फिट' ठेवणारी नवनीता गौतम; RCB ने तिच्यासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : हरिवंश यांची राज्यसभेचे उपसभापती म्हणून निवड केली जाईल

SCROLL FOR NEXT