मुंबई

४४ लाखांची रासायनिक पावडर चोरी

CD

भिवंडी, ता. १६ (वार्ताहर) : तालुक्यातील गोदामात देशभरातून साहित्यांची ने-आण केली जाते; पण यादरम्यान मालाच्या चोरीच्या घटनासुद्धा घडत आहेत. अशाच एका प्रकरणात देहराडून येथून आलेल्या ड्रममध्ये केमिकल पावडरची चोरी करून भलतीच पावडर पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. राहनाळ गावातील मोरेश्वर कंपाउंड या गोदामातून रुबी फार्मा, देहराडून येथे पाठवण्यासाठी ४४ लाख ८५ हजारांचा १,०२५ किलो वजनाचा ४१ ड्रममधील ॲम्प्रोलियम एचसीएल हा औषधी वापरातील पावडर घेऊन जाण्यासाठी ५ जानेवारीला दिला होता. ३ फेब्रुवारीपर्यंत प्रवासादरम्यान पाठवलेल्या मालाच्या ड्रमचे झाकण उघडून त्यामधील पावडर काढून घेत त्या जागी वेगळीच पावडर टाकून ड्रमचे झाकण चिकटवून मालाची चोरी केली. व्यावसायिक निमेश नानक केसवानी यांनी नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT