मुंबई

भाजीपाला मार्केटमध्ये दोन गाड्या जप्त

CD

जुईनगर, ता. १६ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत व्यापारावर प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच मार्केटमध्ये त्यांचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अनधिकृत व्यापाराला बाजारातील प्रमुख व्यक्तीचा पाठिंबा असल्याचा संशय अधिकच गडद झाला आहे.

बाजार आवारात अनधिकृत विक्रीमुळे बाजार समितीच्या महसुलात मोठी घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सभापती प्रभू पाटील आणि सचिवांच्या आदेशानुसार सहसचिव मंदार साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने पॅसेज, धक्के आणि रस्त्यावर शेतमालाची वाहने उभी करून थेट विक्री करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. काही व्यापाऱ्यांनी स्वतःचे अधिकृत गाळे इतरांना भाड्याने देत स्वतः रस्त्यावर आणि धक्क्यावरूनच शेतमाल विक्री सुरू ठेवली होती. यामुळे बाजारातील शिस्त पूर्णपणे बिघडत असून महसुलालाही मोठा फटका बसत आहे. कारवाईदरम्यान जप्त वाहनांना कुलूप करण्यात आले होते. मात्र, हे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनही चक्रावले.

प्रशासनाकडून पंचनामा
एका व्यापाऱ्याने दंड भरला; मात्र उर्वरित दोन गाड्या दंड न भरता सोडाव्यात, असा दबाव संबंधित लोकांकडून टाकण्यात आला. प्रशासनाने पंचनामा केल्यामुळे हा प्रयत्न फोल ठरला. परिस्थिती तणावपूर्ण होताच सुरक्षा अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण करण्याचा इशारा दिला. त्यानंतर संबंधित लोक काही व्यापाऱ्यांसह बाजारात समिती मुख्यालयात गेले. मात्र, सभापतींनी ठाम भूमिका घेत, दंड भरल्याशिवाय गाड्या सोडल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट निर्णय घेतला. अखेरीस संबंधित व्यापाऱ्यांनी दंड भरल्यानंतरच गाड्या सोडण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT