मुरबाड, ता. १६ (वार्ताहर) : भारतीय बौद्ध महासभा, मुरबाड तालुका शाखेच्या कार्यकारिणीच्या पुनर्गठनासाठी अॅड. शरद थोरात यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला विविध घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
धम्मकार्य गतिमान करण्याच्या उद्देशाने ही पुनर्गठन प्रक्रिया राबविण्यात आली. या वेळी ठाणे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, जिल्हा सरचिटणीस छगन सुरवाडे, जिल्हा कोषाध्यक्ष बापू धोडरे, संरक्षण प्रमुख हिरामण पगारे, संस्कार सचिव उत्तम सोनवणे, तालुका संघटक संजय भालेराव, कार्यालयीन सचिव प्रशांत गांगुर्डे, कांतीलाल भाडांगे, भरत घनघाव, किसन रातांबे आदींच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पार पडली. बैठकीला ग्राम शाखांचे पदाधिकारी, विद्यमान कार्यकारिणी सदस्य, बौद्धाचार्य, शिक्षक-शिक्षिका, समता सैनिक दलाचे पदाधिकारी तसेच उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत धम्मकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. नवीन अध्यक्ष अॅड. शरद थोरात यांनी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक व धम्मकार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.