आदिवासीबहुल भागांत धावणार ‘देवाभाऊ रुग्णसेवा’
प्रवीण दरेकर यांच्या पुढाकारातून सहा रुग्णवाहिकांचे वितरण
मुंबई, ता. १६ ः भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर आणि स्व. लिलाराम जांगिड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रातील आदिवासी पाड्यांसाठी सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी झाले.
या लोकार्पण सोहळ्याला वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित, आमदार परिणय फुके, मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, रायगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. यश प्रवीण दरेकर यांसह श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव, शांताई ट्रस्टचे गणेश चव्हाण, द रिसर्च ऑर्गनायझेशनचे अमित तोतला, कालकाई सामाजिक शिक्षण संस्थेचे सुयोग दरेकर, संजय गांधी नॅशनल पार्क येथील गणेश ताटे, किरण पाटील, सिद्धिविनायक रुग्णालयाचे डॉ. अमोल गिते हे प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यातील आदिवासीबहुल विभागात रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत अशा विभागात ‘देवाभाऊ रुग्णसेवा’ या नावाखाली या रुग्णवाहिका सेवा करतील. नंदुरबार येथील शांताई ट्रस्ट, चंद्रपूर-गडचिरोली येथील द रिसर्च ऑर्गनायझेशन, पालघर येथील श्रमजीवी संघटना, शहापूर व संजय गांधी नॅशनल पार्कमधील आदिवासी पाडे आणि रायगड जिल्ह्यातील कालकाई सामाजिक शिक्षण संस्था, अशा सहा संस्थांना या रुग्णवाहीका देण्यात आल्या.
देखभालीसाठी निधी
रायगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. यश प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड प्रतिष्ठानकडून नंदुरबार येथील शांताई ट्रस्ट, चंद्रपूर-गडचिरोली येथील द रिसर्च ऑर्गनायझेशन, पालघर येथील श्रमजीवी संघटना, शहापूर व संजय गांधी नॅशनल पार्क मधील आदिवासी पाडे आणि रायगड जिल्ह्यातील कालकाई सामाजिक शिक्षण संस्था, यांना रुग्णवाहिकांच्या देखभाल दुरुस्तीकरिता प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटपही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.