मुंबई

फणसाड अभयारण्यातील निकृष्ट कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा !

CD

फणसाड अभयारण्यातील कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा
श्रीकांत सुर्वे यांची गणेश नाईक यांच्याकडे मागणी
मुरूड, ता. १६ (बातमीदार) ः मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात गेल्या सहा वर्षांत झालेली विकासकामे निकृष्ट दर्जाची असून, या कामांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सुर्वे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना लेखी निवेदन दिले असून, भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांच्या अभद्र युतीमुळे शासनाचा कोट्यवधींचा निधी वाया जात असल्याचा आरोप केला आहे.
फणसाड अभयारण्यातील २०२० ते २०२६ या कालावधीत अभयारण्यात झालेली आणि सध्या सुरू असलेली कामे अंदाजपत्रकाप्रमाणे झालेली नसून निकृष्ट दर्जाची आहेत. अभयारण्य परिसरात कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी लाखो रुपये खर्चून निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. मात्र, या ठिकाणी एकही कर्मचारी राहत नाही. असे असूनही, याच इमारतींवर वारंवार दुरुस्तीचा खर्च दाखवून शासनाची फसवणूक केली जात असल्याचा दावा सुर्वे यांनी केला आहे. दुसरीकडे, प्राण्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची कामे मात्र प्रलंबित आहेत. अधिकारी आणि कर्मचारी रात्रीची गस्त (पेट्रोलिंग) घालत नसल्याने सांबर व इतर प्राण्यांची शिकार होत आहे. तसेच साग आणि शिसम यांसारख्या मौल्यवान वृक्षांची कत्तल सुरू असल्याचेही सुर्वे यांनी म्हटले आहे. स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय संबंधित ठेकेदारांची बिल अदा कर नये. या ऑडिटमुळे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यामधील आर्थिक भ्रष्टाचार उघडकीस येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करून अभायारण्यातील कामाची चौकशी करण्याची मागणी सुर्वे यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nari Shakti Vandan Act Explained: राजकारणात महिलांचा आता सत्तेवर हक्क! ३३ टक्के आरक्षणाचा गेमचेंजर कायदा काय? विरोधकही का झाले अस्वस्थ!

Womens Reservation Bill: मुस्लिम महिलांच्या मुद्द्यावरुन अमित शाह संतापले; अखिलेश यादव यांना जोरदार प्रत्युत्तर

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Pat Cummins:तो येतोय... काव्या मारनच्या गालावरील खळी आणखीन फुलणार; SRH च्या ताफ्यात भारी खेळाडू दाखल

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

SCROLL FOR NEXT