आमदार मेहता यांच्याविरोधातील तक्रारींसाठी कक्ष
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मिरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीविरोधात अनेक तक्रारी येत आहेत. या सर्व तक्रारींची चौकशी करण्यासाठी निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती असलेला कक्ष स्वखर्चाने स्थापन केला जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसार माध्यमांना दिली.
सरनाईक यांनी गुरुवारी मिरा-भाईंदरमध्ये लोकदरबाराचे आयोजन केले होते. या दरबारात नागरिकांकडून तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. या तक्रारींमध्ये चार ते पाच तक्रारी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीविरोधातील होत्या. या तक्रारींची शहानिशा करून त्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना सरनाईक यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या.
त्यानंतर प्रसार माध्यमांना ते म्हणाले, की सर्वसामान्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी लोकदरबाराचे आयोजन आपण केले आहे. त्यात सेव्हन इलेव्हन कंपनीविरोधातील तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. या सर्व तक्रारी योग्य आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी महसूल, यूएलसी विभाग व महापालिका यांचे निवृत्त अधिकारी, वकील, वास्तुविशारद यांची एक समिती तयार करून त्यांचा एक विशेष कक्ष स्थापन केला जाईल. कंपनीविरोधात आलेल्या सर्व तकारींच्या कागदपत्रांची हे अधिकारी तपासणी करतील व आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही त्याची माहिती दिली जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले.
------
लोकदरबारात अधिकाऱ्यांची दांडी
लोकांच्या तक्रारींवर तत्काळ निर्णय घेण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना लोकदरबारात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु एमएमआरडीएचे अधिकारी मात्र उपस्थित राहिले नाहीत. यावरून सरनाईक चांगलेच संतप्त झाले. एमएमआरडीएचे अधिकारी हरवले आहेत, अशी पोलिसांत तक्रार देतो, असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांना फोनवरून चांगलेच सुनावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.