मुंबई

दिव्यांग मुलांची निसर्गरम्य सहल

CD

दिव्यांग मुलांची निसर्गरम्य सहल

ठाणे, ता. १६ (बातमीदार) : मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या विश्वास संस्थेच्या विद्यार्थ्यांची विशेष सहल मंगळवारी (ता. १४) नेरळ येथील बेंद्रे वेद ॲग्रो फार्म येथे उत्साहात पार पडली. या सहलीचे संपूर्ण नियोजन व आयोजन जिज्ञासा संस्थेने केले होते. निसर्गरम्य वातावरणात भरलेल्या या सहलीत मुलांनी विविध खेळ, उपक्रम आणि आनंददायी क्षणांचा मनसोक्त आस्वाद घेतला.

फार्ममधील गोशाळा हे मुलांसाठी विशेष आकर्षण ठरले. गोशाळेचे प्रमुख योगेश राजपूत यांनी सोप्या भाषेत गोमातेचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच दूध, दही, ताक, लोणी व तूप यांची ओळख करून देत गोधनाचे उपयुक्त पैलू स्पष्ट केले. विविध जातींच्या गायी व बैलांची माहिती देत मुलांना वासरांशी स्नेह जुळवण्याची संधी मिळाली. जिज्ञासाच्या सुमिता दिघे यांनी विविध झाडे, फुले आणि फळांची माहिती दिली. या सहलीत सुरेंद्र दिघे, मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर, शिक्षक, स्वयंसेवक व पालक सहभागी झाले होते. बेंद्रे ॲग्रो फार्मचे मालक श्याम बेंद्रे यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT