मुंबई

परिवहनमंत्र्यांच्या लोकदरबाराची महापौरांकडून तक्रार

CD

परिवहनमंत्र्यांच्या लोकदरबाराची महापौरांकडून तक्रार
भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (ता. १६) मिरा- भाईंदरमध्ये आयोजित केलेल्या लोकदरबाराविरोधात महापौर डिंपल मेहता यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. हा लोकदरबार महापालिकेच्या गोल्ड नेस्ट येथील बाळासाहेब ठाकरे कलादालनात आयोजित करण्यात आला होता, परंतु कलादालन संचालित करण्यासंदर्भात महापालिकेने धोरण अद्याप निश्चित केलेले नाही. असे असताना त्या ठिकाणी लोकदरबाराला परवानगी देणे बेकायदेशीर असल्याचे महापौरांनी आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे सरनाईक विरोधात मेहता हा वाद नव्याने उफाळून आला आहे.
काही दिवसांपूर्वीच महापौर डिंपल मेहता यांनी लोकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी महापौरदिनाचे आयोजन केले होते. यापुढे दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी त्याचे आयोजन केले जाणार आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी मिरा-भाईंदरमध्ये दर महिन्याला लोकदरबार भरविण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार गुरुवारी पहिला लोकदरबार महापालिकेच्या गोल्डन नेस्ट भागातील बाळासाहेब ठाकरे कलादालनात झाला. मात्र, या लोकदरबाराला महापालिकेने दिलेली परवानगी बेकायदा असल्याचे महापौरांचे म्हणणे आहे. यासंदर्भात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना विचारले असता मेहता कुटुंबाने कलादालनाला नेहमीच विरोध केला आहे. या विरोधातूनच ते लोकदरबारालाही विरोध करत आहेत, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

Pune Water Cut : पुणे शहरात पाणी कपात अन तक्रारींचा पाऊस; नऊ दिवसात तब्बल १२०० तक्रारी

Wagholi Accident : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापाऱ्याचा बळी; घसरून पडले, सेफ्टी टँकरच्या चाकाखाली आल्याने मृत्यू

​Kannad News : मुंगसापूरच्या बापु महाराजाच्या आश्रमावर FDA चा छापा; बोगस औषधविक्री संशयावरून कारवाई,'महाराज' हिमालयात गेल्याचा मॅनेजरचा दावा

SCROLL FOR NEXT