मुंबई

पश्चिम आशियातील युद्धाचा वाहन उद्योगावर परिणाम

CD

पश्चिम आशियातील युद्धाचा वाहन उद्योगावर परिणाम
चारचाकींसाठी प्रतीक्षा कालावधी वाढला; ग्राहकांमध्ये नाराजी
वाशी, ता. १६ (बातमीदार) : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळित झाली असून, त्याचा थेट परिणाम वाहन उद्योगावर होत आहे. चारचाकी वाहनांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे उत्पादन मंदावले असून, ग्राहकांना वाहनासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे.
नवी मुंबई व मुंबई परिसरातील अनेक ग्राहकांनी फेब्रुवारीतच वाहन बुकिंग केले असतानाही एप्रिलच्या मध्यावरही वाहनांचा ताबा मिळालेला नाही. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाहन मिळण्याची अपेक्षा असलेल्या ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. वाहनविक्रेत्यांच्या मते, सेमीकंडक्टर चिप्स व धातूंच्या तुटवड्यामुळे उत्पादनावर मर्यादा येत आहेत. पूर्वी २-३ आठवड्यांत मिळणारी वाहने आता किमान ६० दिवसांनी मिळत आहेत.

चौकट
जागतिक तणावाचा थेट फटका ग्राहकांना
पुरवठा साखळीवरील अडथळे आणि कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे वाहन उद्योग संकटात सापडला आहे. त्यामुळे उत्पादन घटल्याने ग्राहकांना जास्त प्रतीक्षा करावी लागत असून, सणासुदीच्या काळातही वाहन उपलब्ध होत नाहीत. जागतिक परिस्थिती सुधारल्याशिवाय ही समस्या कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बॉक्स
फेब्रुवारीमध्ये बुकिंग करूनही अजून वाहन मिळालेले नाही. रोजच्या कामासाठी वाहनाची गरज आहे. मात्र, उशीर होत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. अक्षय तृतीयेला वाहन मिळेल असे सांगितले होते, पण आता तेही अशक्य असल्याचे म्हटले जात आहे.
- अनुप आचरेकर, वाहन खरेदीधारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nari Shakti Vandan Act Explained: राजकारणात महिलांचा आता सत्तेवर हक्क! ३३ टक्के आरक्षणाचा गेमचेंजर कायदा काय? विरोधकही का झाले अस्वस्थ!

Womens Reservation Bill: मुस्लिम महिलांच्या मुद्द्यावरुन अमित शाह संतापले; अखिलेश यादव यांना जोरदार प्रत्युत्तर

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Pat Cummins:तो येतोय... काव्या मारनच्या गालावरील खळी आणखीन फुलणार; SRH च्या ताफ्यात भारी खेळाडू दाखल

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

SCROLL FOR NEXT