मुंबई

सलग सहा तास तबला वादन

CD

बदलापूर, ता. १६ (बातमीदार) : तबल्याच्या सुरांनी भारावलेल्या बदलापूरच्या श्रेयस भोईरने सलग सहा तासांहून अधिक अखंड तबला वादन करत जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’ तसेच ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली आहे. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून तबल्याची आवड जोपासणाऱ्या श्रेयसने जिद्द, सातत्य आणि कुटुंबाच्या पाठबळावर हे यश मिळवत शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे.
अंबरनाथ येथील गुरुकृपा संगीत विद्यालयात गुरू सुनील शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तो तबल्याचे शिक्षण घेत आहे. सध्या तो बदलापूर येथील कार्मेल शाळेत दहावीमध्ये शिक्षण घेत असून शैक्षणिक क्षेत्रातही तो तितकाच उजवा आहे. नववीत त्याने ८७ टक्के गुण मिळवले आहेत. दररोज किमान दोन तास नियमित रियाज करत तो अभ्यास आणि कलेचा उत्तम समतोल साधत आहे. त्याने १५ फेब्रुवारीला सकाळी ८.२२ वाजता सुरू केलेले तबला वादन दुपारी २.२२ वाजेपर्यंत अखंड सुरू ठेवत सहा तास १६ सेकंदांचा विक्रम नोंदवला. या कालावधीत त्याने पेशकार, कायदे, रेल, चलन, तुकडे, फरमाईश आणि गट अशा तबल्यातील विविध प्रकारांचे सादरीकरण केले. या विक्रमाची अधिकृत नोंद १८ फेब्रुवारीला करण्यात आली. यापूर्वी कोलकाता येथील तबलावादकाचा चार तासांचा विक्रम होता, तो मोडून श्रेयसने नवा इतिहास घडवला आहे.
श्रेयसच्या या यशामागे त्याच्या आई-वडिलांचा मोठा त्याग आणि पाठबळ आहे. वडील दत्तात्रय भोईर यांनी आर्थिक साथ दिली, तर आईने त्याच्या अभ्यास आणि कलेवर बारकाईने लक्ष ठेवले. विविध स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत त्याने आपली छाप पाडली आहे. भविष्यात तबला वादनात उच्च शिक्षण घेऊन या क्षेत्रात करिअर घडवण्याचा त्याचा मानस आहे.

श्रेयससारखा विद्यार्थी शिक्षकाच्या आयुष्यात क्वचितच भेटतो. त्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे प्रचंड एकाग्रता आणि कलेप्रती निखळ निष्ठा. तो तबल्यासमोर बसला की आजूबाजूचे जग विसरून पूर्णपणे साधनेत रमून जातो. प्रत्येक ठेका आणि प्रकार तो अत्यंत बारकाईने आत्मसात करतो, त्यामुळे त्याच्या वादनात परिपक्वता जाणवते. हा विश्वविक्रम केवळ एका दिवसाचा पराक्रम नसून अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण साधनेचा आणि मेहनतीचा परिपाक आहे.
- सुनील शेलार, श्रेयसचे गुरू


श्रेयस लहानपणापासूनच जिद्दी असून त्याला कलेवर मनापासून प्रेम आहे. त्याच्या डोळ्यांतील स्वप्न पाहून आम्हीही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. अनेक वेळा आर्थिक अडचणी आल्या. त्याने कधीही हार मानली नाही आणि सातत्याने मेहनत घेत राहिला. आज त्याने मिळवलेले यश पाहून आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो. हा केवळ त्याचा नाही, तर त्याच्या कलेवरील प्रेमाचा विजय आहे.
- दत्तात्रय भोईर, श्रेयसचे वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT