मुंबई

वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे

CD

वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे
वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : मागील काही दिवसांपासून वाघ आणि बिबट्यांची शिकार करणाऱ्या टोळीचे संबंध थेट परदेशातील व्यक्तींशी असल्याचा गौप्यस्फोट वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी ठाण्यात केला. राम गणेश गडकरी रंगायतन येथील जनता दरबारानंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली.
ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील येऊर जंगलालगतच्या वस्तीमध्ये काही दिवसांपूर्वी बाण मारून प्राण्यांना जखमी करण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. येऊर परिसरात तीन बिबट्यांची शिकार झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील काही आरोपी हे स्थानिक पाड्यातील असून, शिकारीमागील साखळी आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडली असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात प्रामुख्याने पुणे, जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि अहिल्यानगर या भागांत बिबट्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. नाशिकमध्ये बिबट्यांच्या नियंत्रणासाठी यंत्रणा सक्रिय असून, आतापर्यंत सुमारे २५० बिबटे पकडून त्यांची पिंजऱ्यांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र सफारी सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भटक्या श्वानांच्या समस्येबाबतही त्यांनी महापालिकांच्या यंत्रणांना अधिक गतिमान करण्याची गरज असल्याचे सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणे आवश्यक असल्याचे मत मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले. मराठी येत नसल्यास व्यवसायाचा परवाना देऊ नये; मात्र रिक्षाचालकांसाठी एक-दोन महिन्यांची मुदत द्यावी, असे ते म्हणाले. १ मेपासून तत्काळ सक्ती करणे अन्यायकारक ठरेल. आधी नोटीस देऊन, मराठी शिकण्यासाठी वेळ दिला पाहिजे. तसेच मराठी ज्ञानाचे प्रमाणपत्र देणारी यंत्रणाही निश्चित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
.........................

९० टक्के तक्रारी मार्गी
१९९५ पासून ते हा उपक्रम राबवत असून, जनतेच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. नवी मुंबई, पालघर आणि ठाणे या भागांतील सुमारे ९० टक्के तक्रारी जनता दरबारातून मार्गी लागल्याचा दावा मंत्री गणेश नाईक यांनी केला. या वेळी विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीच्या सूचना त्यांनी दिल्या.
................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

SCROLL FOR NEXT