मुंबई

उरण बाजारात अलिबागचा पांढरा कांदा दाखल, उशिरा दाखल झाला असला तरी ग्राहकांची खरेदीला पसंती

CD

उरण बाजारात पांढरा कांदा दाखल
उशिरा दाखल झाला असला तरी ग्राहकांची खरेदीला पसंती
उरण, ता. १६ (बातमीदार) ः उरणच्या बाजारात अलिबागचा पांढरा कांदा दाखल झाला आहे. हा कांद्याची आवाक उशिरा झाली असली तरी ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. यामुळे बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने गजबजून गेल्या आहेत.
अलिबागमध्ये कांद्याची लागवड भातकापणी झाल्यानंतर केली जाते. साधारणतः लागवडीनंतर अडीच महिन्यांत कांद्याचे पीक तयार होते.
यावर्षी मात्र पाऊस उशिरापर्यंत पडल्याने कांदा पिकाची लागवड उशिरा करण्यात आली. मात्र, उशीर झाला असला तरीही कांद्याचे पीक चांगले निघाले असल्याचे कार्ले येथील शेतकरी साईनाथ वेले यांनी सांगितले आहे.

२५० ते ३०० हेक्टरवर लागवड
अलिबाग तालुक्यात कार्ले, खंडाळे, पवेळे, नेहुली, तळवली, खाणा-उसर, सोगाव-मारुती या परिसरात हा कांदा पिकवला जातो. रायगड जिल्ह्यात जवळपास २५० ते ३०० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लावगड होते. त्यापैकी एकट्या अलिबाग तालुक्यात २३०-४० हेक्टरवर कांद्याची लावगड होते. काही वेळेस पांढऱ्या कांद्यामध्येसुद्धा अलिबागचा कांदा सांगून पुण्याकडचा कांदा विकला जात असून, ग्राहकांची फसवणूक केली जाते.

१५० ते २०० रुपये माळ
पांढरा कांदा औषधी गुणधर्म, रुचकर, कमी तिखट, चवीला गोड असल्याने पांढऱ्या कांद्याला मागणी वाढत आहे. सध्या मोठ्या आकाराचे कांदे २५० ते ३०० रुपये, तर लहान आकाराचे कांदे १५० ते २०० रुपये माळ या भावाने विकले जात असल्याचे कांदाविक्रेते सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! आयात शुल्क वाढीनंतर आज सर्वात कमी दर; उच्चांकापासून तब्बल 23 हजारांनी स्वस्त; पाहा ताजे भाव

ओबीसी आरक्षणावर गदा, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीआधी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश

Sugarcane farmers: नेत्यांच्या साखरसाम्राज्यात अडकले शेतकऱ्यांच्या घामाचे २१८ कोटी; सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे १२८ कोटींची थकबाकी

Firefly Festival: काजवा महोत्सवाची परदेशी पर्यटकांना भुरळ; जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील निसर्गप्रेमी अकोल्यात

Rajat Patidar: ट्रॉफी जिंकताच कॅप्टन रजत पाटीदारचा मोठा खुलासा, हे सगळं आधीच ठरलेलं होतं' म्हणत नेमकं काय बोलून गेला? पाहा..."

SCROLL FOR NEXT