डहाणूसाठी लवकरच १५ डब्यांची लोकल
१३व्या वर्षपूर्तीनिमित्त लोकलची ट्रायल रन
पालघर, ता. १६ ः डहाणू लोकलला १६ एप्रिलला १३ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने वैतरणा-डहाणू मार्गावर १५ डब्यांच्या लोकलची चाचणी घेतल्याने प्रवासीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे अखेर वैतरणा ते डहाणूदरम्यानच्या रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील रेल्वे समस्या दूर होत नव्हत्या. तसेच अपुऱ्या सेवांमुळे प्रवाशांना माेठा त्रास सहन करावा लागतो. १५ डब्यांच्या लोकलसाठी वैतरणा-डहाणूदरम्यान फलाटांची लांबी वाढवण्यात आली. डहाणू लोकलला १३ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून १५ डब्यांच्या लोकलची चाचणी घेतल्यामुळे काही प्रमाणात का होईना; पण प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सद्यस्थितीला १५ डब्यांच्या लोकलची वेगवेगळ्या अंगाने तपासणी, चाचणी आणि ट्रायल रन घेतली जात आहे.
मोटरमन-गार्ड यांचे स्वागत
१५ डब्यांची लोकल लवकरच विरार ते डहाणूदरम्यान प्रवासी सेवेकरिता धावणार आहे. वैतरणा ते डहाणूदरम्यान सकाळी ८ वाजून ४८ मिनिटांनी सुटलेल्या या लोकलचे मोटरमन आणि गार्ड यांचे स्वागत वेगवेगळ्या स्थानकांवर डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था आणि रेल्वे प्रवाशांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.