मुंबई

डांबरीकरणानंतरही मॅनहोल खोलच

CD

डांबरीकरणानंतरही मॅनहोल खोलच
अपघाताचा धोका, सीबीडी बेलापूरमध्ये कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
तुर्भे, ता. १६ (बातमीदार) : महापालिकेकडून शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे डांबरीकरण सुरू असताना कामांच्या दर्जाबाबत गंभीर त्रुटी समोर येत आहेत. भाऊ पाटील चौक ते आग्रोळी रेल्वे ब्रिज या मार्गावर १५ मार्च रोजी डांबरीकरण करण्यात आले. मात्र, तीन आठवडे उलटूनही मॅनहोल्स रस्त्याच्या समपातळीत आणण्यात आलेले नाहीत. यामुळे दुचाकी व चारचाकी चालकांसाठी धोका निर्माण झाला आहे.
डांबरीकरणामुळे मॅनहोलची झाकणे रस्त्यापेक्षा खोल गेल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अचानक समोर येणाऱ्या खोलगट भागामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच आयटीआयसमोरील फुटपाथवर पाइप टाकण्याचे काम पूर्ण होऊनही साहित्य तसेच पडून असल्याने पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांच्या मते, अभियंता विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी न करता कामे पूर्ण दाखवली जात आहेत. त्यामुळे नाराजी वाढली आहे.

चौकट
निकृष्ट कामांमुळे जीवितास धोका
रस्त्यांच्या कामांमध्ये दर्जाचा अभाव असल्याने नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. तातडीने मॅनहोल समपातळीत आणणे, फुटपाथ मोकळे करणे व कामांवर कठोर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कोट
पालिकेला नागरिकांनी केलेल्या तक्रारी आवडत नसल्याचा अनुभव वारंवार येतो. यावरील सर्वोत्तम उपाय म्हणजे सर्व कामे नियमांनुसार व घटनात्मक उत्तरदायित्व पाळून करणे. त्यामुळे नागरिकांना तक्रार करण्याची वेळच येणार नाही. अभियंते ‘गायब’ असून, कामाचा दर्जा धोक्यात आला आहे. वारंवार तक्रारी करूनही पालिका आयुक्तांकडून कोणतीही कारवाई होत नाही, त्यामुळे प्रशासन निद्रिस्त आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.
- ॲड. हिमांशू काटकर, सदस्य, सजग नागरिक मंच, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT