मुंबई

नवी मुंबईत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला वेग

CD

नवी मुंबईत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला वेग
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची प्रत्यक्ष पाहणी; कामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश
वाशी, ता. १६ (बातमीदार) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या नालेसफाई कामांना वेग देण्यासाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, महापे आणि वाशीपर्यंतच्या नाल्यांची पाहणी करत सर्व कामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
पाहणीदरम्यान नालेसफाई उगमापासून खाडीपर्यंत करण्यावर भर देण्यात आला. गाळ काढण्यासाठी जेसीबी व पोकलेन यंत्रांचा वापर प्रभावीपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच दूषित पाणी नैसर्गिक नाल्यांत जाणार नाही, यासाठी त्याचे योग्य नियोजन करण्यावरही भर देण्यात आला. अडथळे दूर करणे, झाडेझुडुपे हटवणे आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंप यंत्रणा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
वाशी सेक्टर आठ येथील पंपिंग स्टेशनची पाहणी करून १० मेपर्यंत पंप उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले. शहरातील १४ धारण तलावांची साठवण क्षमता ८० टक्क्यांनी घटल्याचे नमूद करत गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर आयआयटीच्या तज्ज्ञांच्या अहवालानुसार तलावांतील गाळ काढून क्षमता वाढविण्याची प्रक्रिया न्यायालयीन परवानगीसाठी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच खारफुटी पुनर्रोपणाची प्रक्रियादेखील सुरू असल्याचे स्पष्ट केले.

चौकट
पूरस्थिती टाळण्यासाठी काटेकोर नियोजन गरजेचे
नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रशासनाने २८ मोठ्या नाल्यांची स्वच्छता १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विविध प्राधिकरणांशी समन्वय साधून पावसाळ्यापूर्व तयारी मजबूत करण्यावर भर देण्यात येत असून, शहराला पूरमुक्त ठेवण्यासाठी ही मोहीम निर्णायक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT