मुंबई

ठाण्यातील सीबीएसई शाळांचा निकाल १०० टक्के

CD

ठाण्यातील सीबीएसई शाळांचा निकाल १०० टक्के
- इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी अव्वल

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १६ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे शहरातील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि डिएवी पब्लिक स्कूल आणि लोकपूरम पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सुरभी रानडे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावून विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अंतिम परीक्षेचा निकाला जाहीर झाला. या निकालात पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सुरभी रानडे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान पटकावून विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध दिनचर्या आणि विषयांची सखोल समज यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले. शालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतानाही शैक्षणिक गुणवत्तेत सातत्य राखणे, ही तिच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाची साक्ष ठरली. तसेच इतर विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळवले आहे. सई खेडेकर व मास्तर संकल्प शिंदे यांनी प्रत्येकी ९६.६ टक्के गुण मिळवले, तर श्रेयस खुले यांनी ९६ टक्के गुण प्राप्त केले. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी उच्च श्रेणीत उत्तीर्ण होत आपल्या गुणवत्तेची ठळक छाप पाडली.

लोकपूरम पब्लिक स्कूल या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये इंद्राणी अनंत देव या विद्यार्थिनीने सर्वाधिक ९७.०४ टक्के गुण मिळवीत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला, तर सक्षम निशांत याने ९७ टक्के मिळवीत दुसरा, तर सई कमलाकर चव्हाण हिने ९६.६८% मिळवून तिसऱ्या क्रमांक पटकावला आहे. या शाळेतील एकूण १६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये अवघ्या सहा विद्यार्थ्यांनी ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवले असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा बापट, बकुल अवराणी आणि लोक फाउंडेशन्सच्या डॉ. पिलिका चंद्रा यांनी माहिती दिली. दरम्यान, डिएवी पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून, अनुज देशपांडे याने ९८.२ टक्के गुण मिळविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT