मुंबई

पाचपाखाडीत मोठे झाड कोसळले; दुकाने व हॉटेलच्या शेडचे नुकसान

CD

पाचपाखाडीत मोठे झाड कोसळले; दुकाने व हॉटेलच्या शेडचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ ः पाचपाखाडी परिसरात मोठे झाड कोसळून दोन दुकाने आणि एका हॉटेलच्या शेडचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी (ता. १६) दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
पाचपाखाडी येथील उत्सव हॉटेलजवळ, सारिका अपार्टमेंटच्या बाजूला आणि त्रिवेणी सोसायटीसमोर मोठे झाड कोसळल्याची माहिती स्थानिक नागरिक प्रदेश शेडगे यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. घटनास्थळी तत्काळ नगरसेवक राजेश मोरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान, वाहतूक पोलिस, महावितरण तसेच वृक्षप्राधिकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. या दुर्घटनेत महावीर जनरल स्टोअर, एन.एक्स. कलेक्शन आणि हॉटेल उत्सव यांच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि वृक्षप्राधिकरण विभागाच्या मदतीने पडलेले झाड कापून एका बाजूला करण्यात आले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Legislative Council election : पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठी घडामोड; सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

Monsoon Update News : आनंदवार्ता ! मॉन्सूनची केरळनंतर कर्नाटकात हजेरी, महाराष्ट्रात 'या' दिवशी दाखल होणार; हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

कमळीच्या आनंदावर पडणार विरजण! आजोबांच्या मृत्यूचं सत्य अखेर समोर; प्रोमो पाहून प्रेक्षकही दुःखी

Pune Lonavala Railway: 'पुणे-लोणावळा रेल्वेमार्ग फुल्ल!' ८८% क्षमतेने धावणाऱ्या मार्गावर नव्या लोकल फेऱ्यांना ब्रेक, रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT