गरोदर महिलांची फरपट
मनोर ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ गैरहजर
मनोर, ता. १६ ः मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ गैरहजर असल्यामुळे गरोदर महिलांना गैरसोय सहन करावी लागली. स्त्रीरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी महिलांना सकाळपासून रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागल्याने मोठी गैरसोय झाली.
मनोर पंचक्रोशीतील गरोदर महिला दर बुधवारी नियमित तपासणीसाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात येत असतात. अनेक महिला सकाळपासून रुग्णालयात पोहोचल्या होत्या, स्त्रीरोगतज्ज्ञ वेळेत हजर नसल्याने गरोदर महिलांच्या तपासण्या खोलंबळ्या होत्या. अनेक तास प्रतीक्षेमुळे गरोदर महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. स्त्रीरोगतज्ज्ञांच्या अनुपस्थितीमुळे आवश्यक तपासण्या रखडल्याचा परिणाम गरोदर महिलांसह बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-----------------
आरोग्य व्यवस्था खिळखिळी
या घटनेमुळे पालघर जिल्ह्यातील रुग्णालयांमधील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत. मनोर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समस्येकडे आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.
---------------------
मनोर ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याला पोहोचण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे गरोदर महिलांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात आला.
- डॉ. रामदास मारद, जिल्हा शल्यचिकित्सक, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.