मुंबई

विरोधकांकडून राजकारण केले जातेय

CD

विरोधकांकडून राजकारण
एमआयएम गटनेते सैफ पठाण यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कोणतीही कागदपत्रे बोगस नसून ती पूर्णपणे अधिकृत आहेत. सहर शेख यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात वकिलांच्या टीमशी चर्चा सुरू आहे. सहर शेख यांच्या जात प्रमाणपत्रावरून तक्रारदार आणि विरोधकांकडून याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप एमआयएम गटनेते सैफ पठाण यांनी केला आहे.
एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे नगरसेवकपद एका तक्रारीच्या अनुषंगाने वादात सापडले आहे. या प्रकरणानंतर नगरसेविका सहर शेख व त्यांचे वडील युनुस शेख हे संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे; मात्र त्यांची बाजू मांडण्यासाठी एमआयएमचे गटनेते सैफ पठाण यांनी माध्यमांसमोर येत, सहर शेख यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुरू असलेल्या वादावर विरोधक आणि तक्रारदारांकडून याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच, युनुस शेख आणि त्यांची मुलगी सहर शेख स्वतः माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही घरगुती कारणांमुळे दोघांनी अद्याप माध्यमांशी संवाद साधला नसून, सध्या ते मुंबईत नातेवाइकांकडे असल्याची माहिती पठाण यांनी दिली. तसेच वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा सैफ पठाण यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT