भिवंडी (वार्ताहर) : मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे २०२५-२६ या वर्षासाठीचा मानाचा ‘साने गुरुजी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. भिवंडीतील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित प. रा. विद्यालयाचे शिक्षक; एनसीसी व आरएसपी अधिकारी नीलेश शंकर नरवडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अवर सचिव प्रवीण मुंढे यांच्या हस्ते नरवडे यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी एनसीसी व आरएसपीच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत हा पुरस्कार बहाल केला. या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष प्रदीप राका, मुख्याध्यापिका नंदा कोंगे, शिक्षकवर्ग, विद्यार्थी; तसेच पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.