मुंबई

मलबार हिल जलशयाची दुरुस्ती

CD

मलबार हिल जलाशय होणार दुरुस्त
मंत्री लोढा ः पाणीपुरवठ्यासाठी तात्पुरती सुविधा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मलबार हिल येथील १४० वर्षे जुन्या जलाशयाला बाधा न होता दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या जलाशयाच्या मागे पालिकेची जागा असून त्या ठिकाणी तात्पुरते जलाशय बांधण्यात येणार असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. दरम्यान, मुंबईतील विविध प्रश्नांवर गुरुवारी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेत निवेदन दिल्याचे लोढा यांनी सांगितले.
मलबार हिल येथील जलाशयाचे पाडकाम केल्यास दक्षिण मुंबईत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या जलाशयाच्या मागे पालिकेची जागा असून त्या ठिकाणी तात्पुरते जलाशय बांधण्यात येणार आहे. यामुळे जलाशयाची दुरुस्ती पूर्ण होईल आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत मुंबईत झोपडपट्टी, आदिवासी भाग, दुर्गम भागात स्कील सेंटर सुरू करण्यात येणार असून मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ३३ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या योजनेचा सगळा खर्च राज्य सरकार करणार असल्याचे ते म्हणाले. महापालिकेमार्फत या कौशल्य केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती आयुक्तांना पत्राद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
...
आयुक्तांशी चर्चा
हँगिंग गार्डन येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी रॅम्प तयार करणे, सायन येथील ‘अम्मान देखनी’ संस्थेजवळील डीपी रोडवर झालेले अतिक्रमण हटवून तो रस्ता रहिवाशांसाठी मोकळा करणे, याबाबत मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली.
...
रिक्त जागेचा निर्णय
विधान परिषदेत १० जागा रिक्त होत आहेत. रिक्त जागेवर ठाकरे सेनेची वर्णी लागावी, यासाठी उद्धव ठाकरे यांनी जुळवाजुळव सुरू केली असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील, असेही लोढा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT