मुंबई

मढ-मार्वे रोडवरील स्टुडिओला आग

CD

मढ-मार्वे रोडवरील स्टुडिओला आग
चित्रीकरण साहित्य जळून खाक, जीवितहानी टळली
मालाड, ता. १७ (बातमीदार) : मढ-मार्वे रोडवरील दाना पाणी येथील भुल्लर स्टुडिओत आज (ता. १७) पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळी ६:१५ वाजता या घटनेची नोंद झाली असून, अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम हाती घेतले.
सकाळी ६:४८ वाजता आगीला ‘लेव्हल-१’ घोषित करण्यात आले. ग्राउंड प्लस वन इमारतीतील सुमारे तीन हजार चौरस फूट क्षेत्रातील पाच ते सहा गाळ्यांमध्ये आग पसरली होती. आगीत इलेक्ट्रिक वायरिंग व उपकरणे, वॉलपेपरचा साठा, लाकडी फर्निचर, परफ्युम्स, कार्यालयीन साहित्य, एसी युनिट्स तसेच बांबू साहित्य जळून खाक झाले.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार फायर इंजिन, तीन जेट टँकर, एक वॉटर टँकर, रुग्णवाहिका तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तैनात होते. याशिवाय पोलिस आणि पालिका कर्मचारीही मदतीसाठी उपस्थित होते. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी ९:१२ वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अग्निशमन दल आणि पोलिस तपास करीत आहेत.

वारंवार घटनांमुळे प्रश्‍नचिन्ह
वारंवार लागणाऱ्या आगींवर प्रश्नचिन्ह
मढ परिसरातील धारवली गाव, दाना पाणी तसेच मढ बेट परिसरात शूटिंग साहित्य असलेल्या गोदामे आणि स्टुडिओंना यापूर्वीही अनेक वेळा आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे सुरक्षा उपाययोजना आणि यंत्रणांच्या ऑडिटबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...

Maharashtra CM Relief Fund : ४० हजार रुग्णांना जीवदान! मुख्यमंत्री निधीतून ३३३ कोटींची मोठी मदत, जाणून घ्या कसा मिळतो फायदा

GT vs KKR Live: कॅमेरून ग्रीनचा 'माँस्टर' Six! महागड्या Sierra गाडीला डेंट... TATA देणार ५ लाख, जाणून घ्या नेमकं प्रकरण, Video

Women Reservation Bill : "भारतानं पाहिलं, इंडिया आघाडीनं रोखलं," महिला आरक्षण नामंजूर होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT