मुंबई

महिलांचा क्रिकेट स्पर्धेत डंका

CD

क्रिकेटच्या मैदानात महिलांचा डंका
वसईतील स्पर्धेत ९६ खेळाडूंचा सहभाग
वसई ता.१७ (बातमीदार)ः माणिकपूरच्या ‘यंग मेन्स कॅथोलिक असोसिएशन’च्यावतीने भरवलेल्या क्रिकेट स्पर्धेत १२ संघांतून ९६ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. क्रीडा क्षेत्रातही महिलांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ही स्पर्धा भरवण्यात आली होती.
खुल्या गटात झालेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेत १२ वर्षीय शनाया डीमेलो ‘उदयोन्मुख खेळाडू’, सिंथिया न्युन्स सर्वोत्तम गोलंदाज’ तर रश्मी एनसिया कार्व्हालो हिला ‘सर्वोत्तम फलंदाज पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच ५ ते ११ वयोगटातील मुलींसाठी विशेष प्रदर्शनीय सामना लक्षवेधक ठरला. या उपक्रमामुळे लहान वयोगटातील मुलींमध्ये क्रीडाप्रती आवड निर्माण करण्यास मदत झाली. यंग मेन्स कॅथोलिक असोसिएशनच अध्यक्ष प्रकाश रॉड्रिग्ज, रोहन मिनेझिस, आनंद मिनेझिस, लॉरेन्स लोपीस, अॅलिस्टर कोलासो, पॉल मिनेझिस, सागर डिसिल्वा, रॉयसन आल्मेडा, शुभम डिकोस्टा, अमित वाझ, फा.अ‍ॅसिस रोड्रिग्स, फा. स्टीफन गोसाळ यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.
-------------------------
पालघरचा शार्दूल ठाकूर, वसईतील आयुष्य म्हात्रे क्रिकेट विश्वात चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे महिलांना देखील पुढे यावे, याकरिता क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली.
- सागर डिसिल्व्हा, संचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: भाजप आमदारांच्या गाडीचा अपघात! दुचाकीची कारला जोरदार धडक, गाडीचा चक्काचूर; नेमकं काय घडलं?

Gangapur Crime : अवैध वाळू व अवैध मुरूम उपसा करणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT