मुंबई

जिल्ह्यातील आंबा उत्पादक संकटात !!!

CD

आंबा उत्पादक संकटात
बदलत्या वातावरणाचा उत्पादनाला फटका
वाणगाव, ता. १६ (बातमीदार)ः पालघरचा आंबा दरवर्षी एप्रिलमध्ये बाजारात विक्रीसाठी येतो, परंतु यंदा निसर्गाच्या कोपामुळे आंबा मेमध्ये बाजारात दाखल होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आंबा उत्पादक नुकसानीच्या भीतीने धास्तावला आहे.
पालघर जिल्ह्यातील केशर आंबा मुंबई, वाशी, नाशिक, पुणे, आग्रा, दिल्ली येथे विक्रीसाठी जातो. यंदाही जिल्ह्यातील आंब्याला मोठी मागणी होती. त्यामुळे झाडावर फळ टिकून रहावे, यासाठी मोहोर संरक्षणावर मोठा खर्च बागायतदारांनी केला होता. काहीअंशी मोहोर वाचून चांगली फळाधारणा झाली होती, परंतु अतिउष्णता, वेगवान वाऱ्यामुळे फळे गळून गेली आहेत. त्यामुळे केलेला खर्चही निघणार नाही, अवस्था शेतकऱ्यांची झाली असून, अत्यल्प उत्पादन हाती लागण्याची शक्यता आहे.
------------------------------
मोठ्या प्रमाणात फळगळ
पालघर जिल्ह्यात सातत्याने होणारे पर्यावरणीय बदल, अस्थीर बाजारभाव, मजूर टंचाई अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांनी चिकूऐवजी आंबा फळपिकाची पर्यायी लागवड केली आहे, पण निसर्गातील लहरीपणामुळे आंब्याची मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने उत्पादनाची शाश्वती राहिली नाही.
-------------------------
नुकसानीचा धोका
मेमध्ये उष्णतेचा तडाखा असल्याने आंब्याची मागणी कमी होते, याचा फटका उत्पादनावर निश्चितच होणार आहे. तसेच परराज्यातील आंबा देखील मार्केटमध्ये दाखल होत असल्यामुळे बाजारभाव कमी मिळणार असल्याने दुहेरी कात्रीत सापडल्याने नुकसान होण्याचा धोका वाढला आहे.
------------------------
प्रक्रिया उद्योगांवर परिणाम
पालघर जिल्ह्यात आंबा फळपिकावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग आहेत. आंब्यावर प्रक्रिया करून अनेक पदार्थ तयार केले जातात. यंदा आंबा उत्पादनाची स्थिती नाजूक असल्याने प्रक्रिया उद्योगांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे,
---------------------------
उत्पादन कमी होण्याची कारणे :
- अवकाळी पावसाचे संकट
- मोहोराऐवजी भरपूर प्रमाणात पालवी
- पावसामुळे जमिनीत ओलावा टिकून राहिला
- ऑक्टोबर हिट, थंडी असा दुहेरी मारा
- मोहोर लांबणीवर गेल्याने फळधारणेलाही उशीर
- ढगाळ वातावरण, जोरदार वाऱ्यामुळे फळगळ
------------------------------
उशिरापर्यंत पाऊस लांबल्याने, मधमाश्यांचे घटत जाणारे प्रमाण, कुशल मजुरांची टंचाई, अति उष्णता, वातावरणात सातत्याने होणारे बदलामुळे मोठ्या प्रमाणात आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. खूपच कमी उत्पादन हाती लागणार असल्याने आंबा उत्पादकांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.
- अनिल पाटील, कृषिरत्न, सांगे, वाडा
--------------------------
हवामान बदलामुळे तापमानातील चढ-उतारामुळे आंब्याच्या मोहोरावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आंबा उत्पादनमध्ये घट येण्याची शक्यता आहे. कृषी विभाग, कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञांच्या पाहणी दौऱ्यानंतर तसा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे.
- नीलेश भागेश्वर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bills : मत मिळवण्याच्या परिक्षेत मोदी सरकार फेल! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर

Illegal Sand Mining: लांजीत पैनगंगा नदीपात्रात ट्रेझर बोट, जेसीबीने अवैध वाळू उत्खनन; सायफळ घाट बंद तरीही प्रशासन मूकदर्शक

Hormuz Strait Reopens : होर्मुझची सामुद्रधुनी खुली होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, सामान्यांना दिलासा; शेअर बाजारातही उसळी

Akshayy Tritiya 2026 : यंदाच्या अक्षय्य तृतीयेला एक नाही दोन राजयोगांचा धमाका ! 3 राशी होणार अफाट श्रीमंत

मोठी बातमी! LPG वापरकर्त्यांचं संकट संपणार, अखेर होर्मुझची सामुद्रधुनी खुली… इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT