मुंबई

आठवडा बाजारात चिंच विक्रीला जोर

CD

आंबट चिंचेला बाजारात भाव
डहाणू तालुक्यातील उत्पादन घटल्याचा परिणाम
कासा, ता. १७ (बातमीदार)ः डहाणू तालुक्यात एप्रिल, मेच्या कालावधीत चिंचेचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, यंदा उत्पादन कमी, वाढलेल्या खर्चामुळे बाजारात भाव चांगलाच वधारला आहे.
स्वयंपाकात आंबट चवीसाठी चिंच अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. आमटी, वरण, विविध रस्सा भाज्या, भेंडीची भाजी तसेच चटण्या, चाट, वडा-पाव यांसारख्या पदार्थांमध्ये चिंचेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. विशेषतः पालघर जिल्ह्यात मासे, मांसाहारी पदार्थांमध्ये आंबट चवीसाठी चिंचेचा वापर अधिक प्रमाणात होतो. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे जंगल, परिसरातून चिंच गोळा करून विक्री करत असल्याने त्यांचा उदरनिर्वाह होतो. ग्रामीण दुर्गम भागातील गरीब नागरिक तर भात, चिंचकडीचा वापर करीत आपले जेवण करीत असतात.
-----------------------
१६० रुपये किलो
चिंच झाडावरून काढणे, त्यातील चिंचोटी वेगळी करणे, त्यावर मीठ प्रक्रिया करण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने विक्रेत्यांना वाढीव भावाने विक्री करावी लागत आहे. सध्या चांगल्या प्रतीची चिंच १६० रुपये किलो भावाने विकली जात असून, चिंचोटी काढलेली चिंच ८० ते १२० रुपये किलोला आहे.
------------------------
पावसाळ्यात तसेच वर्षभर स्वयंपाकात चव आणण्यासाठी चिंच लागते. त्यामुळे एप्रिल-मेमध्ये आम्ही चिंच खरेदी करून साठवण करतो. पालघर जिल्ह्यात चिंचेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
- हेमंत धानमेर, ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...

Maharashtra CM Relief Fund : ४० हजार रुग्णांना जीवदान! मुख्यमंत्री निधीतून ३३३ कोटींची मोठी मदत, जाणून घ्या कसा मिळतो फायदा

GT vs KKR Live: कॅमेरून ग्रीनचा 'माँस्टर' Six! महागड्या Sierra गाडीला डेंट... TATA देणार ५ लाख, जाणून घ्या नेमकं प्रकरण, Video

Women Reservation Bill : "भारतानं पाहिलं, इंडिया आघाडीनं रोखलं," महिला आरक्षण नामंजूर होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT