मुंबई

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाने घेतली उपप्रादेशिक परीव्हाना अधिकाऱ्यांची भेट घेतली

CD

बेकायदा प्रवासी वाहतुकीवर आळा आणा
राष्ट्रवादी कॉँग्रेसची उपप्रादेशिक परीवहन अधिकाऱ्यांकडे मागणी

कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : रायते पुलावर झालेला भीषण अपघात हा प्रशासनाचा निष्काळजी व हलगर्जी असल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) संघटक सचिव वल्ली राजन यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

या वेळी त्यांच्यासोबत पक्षाचे विमुक्त भटक्या जमाती सेलचे कल्याण जिल्हाध्यक्ष दिनेश परदेशी, कल्याण-डोंबिवली जिल्हा अल्पसंख्याक विभागाच्या प्रभारी अध्यक्ष रमजान अन्सारी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, कल्याण-डोंबिवली जिल्हा (अजित पवार गट) पक्षाचे सरचिटणीस संतोष पाटील, असंघटित कामगार विभाग कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष गोरख शिंदे, तोषेश शुक्ला उपस्थित होते.

कल्याण ते मुरबाड या मार्गावर मोठ्या प्रमाणात बेकायदा ‘काळी-पिवळी’ टॅक्सी तसेच खासगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक सर्रास सुरू असून, एका वाहनात १५ ते २० प्रवासी धोकादायक पद्धतीने नेले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब मोटार वाहन कायद्याचा उघड भंग असून, नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ केला जात आहे. विशेष म्हणजे, महात्मा फुले चौक, कल्याण येथील वाहतूक पोलिस कार्यालयाजवळच या बेकायदेशीर वाहनांचा उघड थांबा सुरू असल्याने संबंधित यंत्रणांची निष्क्रियता असल्याचे सांगण्यात येत आहे.
----------------
बेकायदा वाहतूक बंद करावी
कल्याण-मुरबाड मार्गावरील सर्व बेकायदा प्रवासी वाहतूक तत्काळ बंद करावी. संबंधित वाहनांवर कठोर दंडात्मक व जप्तीची कारवाई करावी. अपघाताच्या दिवशी ड्युटीवरील अधिकाऱ्यांची चौकशी करून शिस्तभंग कारवाई करावी. बेकायदा थांबे हटवून अधिकृत वाहतुकीची व्यवस्था करावी. नागरिकांसाठी विशेष तक्रार निवारण यंत्रणा सुरू करावी. या मार्गावर सातत्याने विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी या वेळी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khan Sir Firing Case: गोळीबारप्रकरणी खान सरांनाच अटक होण्याची शक्यता; दोन्ही अंगरक्षकांनी गोळीबाराची दिली कबुली

Vaibhav Sooryavanshi: Dhoni आणि 'गँग्स ऑफ वासेपूर'नंतर आता Vaibhav सूर्यवंशी ऋद्धिमा पाठकचा खळबळजनक खुलासा, Video Viral

Iran Crisis: मोजतबा खामेनींना सत्तापालटाची भीती! इराणमध्ये कठोर नियम लागू; अमेरिका-इस्त्रायलवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

IND vs AFG: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! विराट कोहली मालिकेबाहेर? 'हा' खेळाडू घेणार जागा!

SCROLL FOR NEXT