मुंबई

बदलापूरच्या मुख्य बाजारपेठेतील ई-टॉयलेटसमोरच घाणीचा विळखा

CD

मुख्य बाजारपेठेत घाणीचा विळखा
ई-टॉयलेटसमोरच कचऱ्याचा ढीग; नागरिकांची कारवाईची मागणी

बदलापूर, ता. १७ (बातमीदार) : बदलापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. धक्कादायक म्हणजे, पालिकेने उभारलेल्या ई-टॉयलेटसमोरच हा कचरा टाकण्यात येत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच ही जागा स्थानक परिसरात येत असल्याने गर्दीच्या वेळी लोकांना याच कचऱ्यातून वाट काढत जावे लागत असल्याचे चित्रदेखील पाहण्यास मिळते.

बदलापूर रेल्वे स्थानकासमोर ही मुख्य बाजारपेठ आहे. येथे दररोज हजारो प्रवासी, भाजी व फळविक्रेते यांची वर्दळ असते. याच परिसरात नागरिकांच्या सेवेसाठी पालिकेने ई-टॉयलेटची उभारणी केली आहे. याच ई-टॉयलेटसमोर चक्क कचरा फेकण्याचा प्रकार घडत आहे. हा कचरा वेळीच उचलला गेला नाही तर तो तसाच साचून त्यातून घाण वास येण्यास सुरुवात होते. तसेच माशा त्याच्यावर घोंघावताना दिसतात. त्यामुळे यावर तातडीने योग्य कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दुसरीकडे, एवढ्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. त्यातच पालिका व कंत्राटदार एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचेही पाहण्यास मिळत आहे.

लोकप्रतिनिधी नसताना जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती आजही कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मग आम्ही लोकप्रतिनिधी कशासाठी निवडून दिले, असा थेट सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. बदलापूर शहर कचरामुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

बदलापूर पश्चिम बाजारपेठेत कचरा जमा होऊ नये, यासाठी त्या जागी ई-टॉयलेट बसवण्यात आले; मात्र बाजारपेठेतील भाजी व फळविक्रेते हे रात्रीच्या वेळेत साचणारा कचरा याच ठिकाणी येऊन टाकतात. त्यामुळे रात्रभर कचऱ्याचा मोठा ढीग या ठिकाणी असतो. पहाटे लवकर तो साफ केला जातो; मात्र यामुळे रात्री ते पहाटेपर्यंत या ठिकाणी शौचालयाचा वापर करता येत नाही, हे स्पष्ट होत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून पुढील आठवड्यापर्यंत एक आणखीन एक वेगळा प्रयोग राबवून, येथील कचरा दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी श्रेया शिरवटकर यांनी दिली आहे.

----------------
शौचालयाची व्यवस्था नाही
मुंबईहून दोन तासांचा प्रवास करून बदलापुरात पोहोचलेल्या प्रवाशांसाठी लघुशंकेकरिता योग्य सुविधा उपलब्ध नाही. तसेच रेल्वे फलाट क्रमांक एकवर शौचालयाची व्यवस्था नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही प्रवासी या बाजारपेठेतील ई-टॉयलेटचा वापर करतात; पण हे ई-टॉयलेट अशाप्रकारे घाणीच्या विळख्यात अडकले आहे. त्याचा वापर करण्यासाठी घाणीतून वाट काढत जावे लागत असल्याची तक्रार प्रवाशांसह भाजीविक्रेत्यांनी केली आहे.

-------------

ई-टॉयलेटच्या परिसरातील घाणीमुळे दुर्गंधी पसरते व येथे निर्माण होणारे कीटक हे खाद्यपदार्थांवर येऊन बसतात, त्यामुळे रोगराईची भीती आहे. ही सगळी परिस्थिती पाहूनदेखील बदलापूर नगरपालिकेचे आरोग्य विभाग नक्की काय करत आहे, हा प्रश्न निर्माण होत आहे. आरोग्य सभापतींनी दखल घेऊन बदलापूर शहरातील स्वच्छतेसंदर्भात ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
- अर्चना सरूडकर, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...

Maharashtra CM Relief Fund : ४० हजार रुग्णांना जीवदान! मुख्यमंत्री निधीतून ३३३ कोटींची मोठी मदत, जाणून घ्या कसा मिळतो फायदा

GT vs KKR Live: कॅमेरून ग्रीनचा 'माँस्टर' Six! महागड्या Sierra गाडीला डेंट... TATA देणार ५ लाख, जाणून घ्या नेमकं प्रकरण, Video

Women Reservation Bill : "भारतानं पाहिलं, इंडिया आघाडीनं रोखलं," महिला आरक्षण नामंजूर होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT