मुंबई

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दुचाकीचा अपघात.

CD

मुंबई-पुणे मार्गावर दुचाकीचा अपघात
तीन जण जखमी ः चालकविरोधात गुन्हा दाखल
खालापूर, ता. १७ (बातमीदार) ः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दुचाकी बंदीचे नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने वाहन चालवणे एका तरुणाला महागात पडले आहे. सावरोली गावानजीक झालेल्या या अपघातात दुचाकीवरील तिघे जण जखमी झाले असून याप्रकरणी खालापूर पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ताहा हमीद शेख (रा. विक्रोळी) याचे बुधवारी (ता. १५) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन मुंबई-पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने निघाले होते. खालापूर हद्दीत सावरोली गावानजीक आली असता खान यांनी कंटेनरला ओव्हरटेक करत दुचाकी दुसऱ्या लेनमध्ये नेली. त्यावेळी कंटेनरच्या समोरील बाजूस दुचाकीची धडक बसल्याने अपघात घडला. यामध्ये ताहा शेख आणि त्याच्या सोबत असलेले दोन जण
जखमी झाले आहेत. कंटेनर चालक सोनू पाल यांनी खान यांच्याविरोधात खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार दुचाकी वाहन मुंबई-पुणे महामार्गावर नेणे, ट्रिपल सिट, विना हेल्मेट वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार सुनील शेळके हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs KKR Live: अजिंक्य रहाणेचे सर्व डावपेच फसले; पॉवर प्लेमध्ये KKR चा फुसsssका बार.. IPL 2026 मध्ये नकोसा विक्रम नावावर

Karnataka Political Crime : भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी काँग्रेस आमदाराला जन्मठेपेची शिक्षा, न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

खरातसारखी प्रकरण थांबणार नाहीत! भारत गणेशपुरे असं का म्हणाले? म्हणाले, 'लोकांना पैशांची इतकी हाव...'

Women Reservation Bills : मत मिळवण्याच्या परिक्षेत मोदी सरकार फेल! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर

Illegal Sand Mining: लांजीत पैनगंगा नदीपात्रात ट्रेझर बोट, जेसीबीने अवैध वाळू उत्खनन; सायफळ घाट बंद तरीही प्रशासन मूकदर्शक

SCROLL FOR NEXT