तुपगावातील गावठाण रस्ता वाद चिघळला
दोन्ही कुटुंबांचा आत्मदहनाचा इशारा
खालापूर, ता. १७ (बातमीदार) : तुपगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जागेतील रस्त्याच्या वादाने तीव्र रूप धारण केले असून, प्रशासनासाठी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. सरपंच व ग्रामसेवक यांच्या मध्यस्थीनंतरही वाद न मिटल्याने संबंधित दोन्ही कुटुंबांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
तुपगाव येथे आलिया मुल्ला व किशोर मोरे यांची घरे शेजारी असून, गावठाणातील वहिवाटीच्या रस्त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. मुल्ला यांनी त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी नोंद असलेला रस्ता मिळावा, यासाठी ग्रामपंचायतीकडे अनेकदा अर्ज केले आहेत. त्यांनी मोरे यांनी वहिवाटीच्या जागेत वाढीव बांधकाम केल्याची तक्रार केली आहे. यावर मोरे यांनी कुटुंब वाढल्यामुळे घराचा पडवी भाग वाढवल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, बांधकाम तोडण्याच्या मागणीवरून वाद अधिक चिघळला असून, दोन्ही बाजूंनी टोकाची भूमिका घेतली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले असून, वरिष्ठांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
कोट
-२०१८ पासून मी राहत असून, नियमानुसार रस्ता मिळावा यासाठी प्रशासनाकडे फेऱ्या मारत आहे. १० दिवसांत रस्ता न मिळाल्यास मी आणि आई पंचायत समितीसमोर आत्महत्या करणार आहे.
- आलिया मुल्ला, रहिवासी तुपगाव
कोट-
सरपंच, ग्रामसेवक हे जाणीवपूर्वक त्रास देत असून, आम्ही कित्येक वर्षे या ठिकाणी राहतो. माझे बांधकाम तोडल्यास मी आत्मदहन करणार आहे.
- किशोर मोरे, तुपगाव
कोट-
दोन्ही तक्रारदारांकडून प्राप्त अर्जांनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याशिवाय आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर योग्य तो तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- विश्वास वारे, ग्रामसेवक, तुपगाव ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.