मुंबई

सेवा दल सैनिक श्रीकांत चित्रे यांचे निधन

CD

सेवा दलाचे श्रीकांत चित्रे यांचे निधन

डोंबिवली : ज्येष्ठ राष्ट्र सेवा दल सैनिक श्रीकांत चित्रे यांचे वयाच्या ९०व्या वर्षी गुरुवारी (ता. १६) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक व प्रगतिशील चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ता हरपला आहे. लहानपणापासूनच राष्ट्र सेवा दलाशी जोडले असलेले चित्रे यांनी दादर येथील युवक सभांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. पुढे त्यांनी प्रजा समाजवादी पक्षाच्या कार्यातही योगदान दिले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभाग घेत त्यांनी दहा दिवसांचा तुरुंगवास भोगला होता.
मंत्रालयात ३२ वर्षे सेवा बजावत त्यांनी ज्युनियर असिस्टंट ते डेप्युटी सेक्रेटरी असा प्रवास केला. सचोटी आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी आपली ओळख निर्माण केली. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनीही त्यांच्या कार्याची प्रशंसा केली होती.
विचारांनी धर्मनिरपेक्ष आणि प्रगतिशील असलेल्या चित्रे यांना लेखनाचीही आवड होती. विविध वर्तमानपत्रांतून त्यांनी सामाजिक समता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य यावर लेखन केले. त्यांच्या निवडक लेखांचे ‘अंतरंग’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय आणि मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT