मुंबई

उन्हाचा पारा वाढत चालल्याने मुरबाड शहरातील अंगणवाड्यांच्या वेळेत बदल करण्याची पालकांची मागणी

CD

उन्हाचा पारा वाढला
अंगणवाड्यांच्या वेळेत बदल करण्याची पालकांची मागणी

मुरबाड, ता. १७ (बातमीदार) : मुरबाड शहर व परिसरात दिवसेंदिवस तापमान वाढत चालल्याने लहान मुलांना घराच्या बाहेर पाठवणे जिकिरीचे होत आहे, अशा परिस्थितीत मुरबाड शहरातील अंगणवाड्यांमध्ये बालकांना दुपारी साडेबारापर्यंत थांबवले जात आहे. या अंगणवाडी केंद्रांची वेळ कमी करून लहान मुलांना उन्हाच्या पूर्वीच अंगणवाडीतून घरी सोडावे अशी मागणी पालकांनी केली आहे.

मुरबाड शहरात एकूण २१ अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये ५०० पेक्षा जास्त बालके दररोज येत असतात. त्यांची अंगणवाडी केंद्राची वेळ सकाळी ९ ते १२.३० पर्यंत आहे. मुरबाड शहरात तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे, अशा परिस्थितीत तीन ते सहा वयोगटातील लहान बालकांना भरदुपारी उन्हातून घरी आणणे पालकांना त्रासदायक होत आहे. त्यामुळे या अंगणवाड्यांची वेळ बदलून ती ११ वाजेपर्यंत करावी अशी पालकांची मागणी आहे. मुरबाड शहरातील २१ अंगणवाड्यांचे संचलन एकात्मिक बालविकासाकडे आहे. त्यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी बैठकीत असल्याचे सांगत नंतर संपर्क करू, असे त्यांनी सांगितले. तसेच अंगणवाडी केंद्रांची वेळ कमी करण्याबाबत मुरबाड पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी मधुकर घोरड यांच्याशी संपर्क साधला असता मुरबाड शहरातील अंगणवाड्या आमच्या विभागाकडे येत नाहीत, त्यामुळे जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना संपर्क करून या अंगणवाड्यांची वेळ कमी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
--------
फक्त चार अंगणवाड्याच शासकीय इमारतीत

शहरात एकूण २१ अंगणवाड्या आहेत. त्या पैकी फक्त चार अंगणवाड्यांना शासकीय इमारती उपलब्ध आहे, इतर १७ अंगणवाड्या भाड्याच्या खोल्यांमध्ये भरविल्या जातात. या अंगणवाड्यांमध्ये दुपारपर्यंत बसण्याचा नियम एकात्मिक बालविकास विभागाचा आहे. मागील वर्षी या अंगणवाडी केंद्रांची वेळ सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत होती, यावर्षी मात्र अद्यापही तशी सूचना काढण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही अंगणवाडी केंद्राची वेळ कमी करू शकत नाही असे अंगणवाडी सेविका यांनी माहिती दिली.
-----

अंगणवाडीत जाणाऱ्या लहान मुलांना दुपारी साडेबारा वाजता सोडण्यात येते. त्यांना भरउन्हातून घरी आणण्यास आम्हाला त्रास होतो. लहान बालकांची सुरक्षा लक्षात घेऊन अंगणवाडी केंद्राची वेळ सकाळी ११ पर्यंत करण्यात यावी.

- स्मिता सुधीर, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bills : मत मिळवण्याच्या परिक्षेत मोदी सरकार फेल! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर

Illegal Sand Mining: लांजीत पैनगंगा नदीपात्रात ट्रेझर बोट, जेसीबीने अवैध वाळू उत्खनन; सायफळ घाट बंद तरीही प्रशासन मूकदर्शक

Hormuz Strait Reopens : होर्मुझची सामुद्रधुनी खुली होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, सामान्यांना दिलासा; शेअर बाजारातही उसळी

Akshayy Tritiya 2026 : यंदाच्या अक्षय्य तृतीयेला एक नाही दोन राजयोगांचा धमाका ! 3 राशी होणार अफाट श्रीमंत

मोठी बातमी! LPG वापरकर्त्यांचं संकट संपणार, अखेर होर्मुझची सामुद्रधुनी खुली… इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT