गोसन्मानासाठी मुलुंडमध्ये स्वाक्षरी अभियान
मुलुंड, ता. १७ (बातमीदार) : मुलुंड परिसरात गोसन्मानाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी बजरंगी राम सेवा संस्थेच्या पुढाकाराने स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातून नागरिकांमध्ये जनजागृती घडवून आणण्याबरोबरच गौसंवर्धनाच्या मुद्द्यावर एकत्रित मतप्रवाह निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हे अभियान १८ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत मुलुंडमधील विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार असून, स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. यादरम्यान संकलित करण्यात आलेल्या स्वाक्षऱ्या २७ एप्रिलला मुलुंड तहसीलदार कार्यालयात सुपूर्द केल्या जाणार आहेत. यासाठी संस्थेने शुक्रवारी (ता. १७) तहसीलदार कार्यालयात निवेदनही सादर केले आहे. याप्रसंगी मुलुंड येथील गोपालक राकेश राघवन, संस्थेचे अध्यक्ष अरुण लालता सरोज, खजिनदार राजबहादूर यादव, संस्थापक रमेश प्यारेलाल गुप्ता यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.