मुंबई

महिलेची सोनसाखळी लंपास करण्याचा प्रयत्न

CD

महिलेची सोनसाखळी लंपास करण्याचा प्रयत्न
पोलिसांच्या सतर्कतेने आरोपी पकडला
घाटकोपर, ता. १७ (बातमीदार) ः पंतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुष्प विहार जंक्शन येथे आज (ता. १७) पहाटे ६.३० वाजताच्या सुमारास महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावण्याची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ७४ वर्षीय किशोरी प्रवीण मेहता यांची सोनसाखळी खेचून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी तैनात असलेल्या बीट मार्शल पोलिस शिपाई रवींद्र कुऱ्हे यांनी तत्परता दाखवत दुचाकीवर मागे बसलेल्या संशयिताला पकडण्यात यश मिळवले. दरम्यान, त्याचा साथीदार इरफान हा दुचाकीसह फरार झाला.
पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद अली शौकत अली मिर्झा (वय १९, रा. रफिक नगर, गोवंडी) असे आहे. या प्रकरणात चोरण्यात आलेली सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, आरोपींनी सकाळी ६.२२ वाजता टिळकनगर पोलिस ठाणे हद्दीतही अशाच प्रकारे सोनसाखळी चोरी केल्‍याची कबुली दिली आहे. सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, फरार आरोपी इरफानच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पंतनगर पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT