मुंबई

राजिपतर्फे ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान

CD

राजिपतर्फे ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान
अलिबाग, ता. १७ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा वरसोली येथे पार पडली. कार्यशाळेला अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांसह विविध तालुक्यांतील अधिकारी उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने उद्‍घाटन झाल्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. डॉ. नेहुलकर यांनी अभियानाची रूपरेषा स्पष्ट करत गावपातळीवर सर्वसमावेशक कृतीद्वारे आरोग्यसंपन्नता साध्य करण्यावर भर दिला. नेहा भोसले यांनी मिशन मोडमध्ये वर्षभर अभियान राबवण्याचे आवाहन केले. मधुकर पाटील यांनी औषधसाठा व जबाबदारीवर भर देत कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. मंगेश वाकडीकर यांनी सर्वांच्या सहभागातून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेत विविध समस्या व रुग्णालयीन कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bills : मत मिळवण्याच्या परिक्षेत मोदी सरकार फेल! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर

Illegal Sand Mining: लांजीत पैनगंगा नदीपात्रात ट्रेझर बोट, जेसीबीने अवैध वाळू उत्खनन; सायफळ घाट बंद तरीही प्रशासन मूकदर्शक

Hormuz Strait Reopens : होर्मुझची सामुद्रधुनी खुली होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, सामान्यांना दिलासा; शेअर बाजारातही उसळी

Akshayy Tritiya 2026 : यंदाच्या अक्षय्य तृतीयेला एक नाही दोन राजयोगांचा धमाका ! 3 राशी होणार अफाट श्रीमंत

मोठी बातमी! LPG वापरकर्त्यांचं संकट संपणार, अखेर होर्मुझची सामुद्रधुनी खुली… इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT