उल्हासनगर, ता. १७ (वार्ताहर) : रायते परिसरातील भीषण अपघातानंतर प्रशासनाने अखेर कठोर पावले उचलत वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. कल्याण-मुरबाड रस्त्यावर राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ओव्हरलोडिंगसह विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी अक्षरशः शिकंजा आवळला असून, या कारवाईत लाखोंचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रायते येथील अपघातानंतर उल्हासनगर वाहतूक विभाग सतर्क झाला आहे. कल्याण-मुरबाड मार्गावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. बिर्ला गेट, सेक्शन १७, गोलमैदान आणि नेहरू चौक या प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान ओव्हरलोडिंग करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करत चार इको गाड्या आणि सहा रिक्षांसह विविध वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये चालकांनी गणवेश न घालणे, विमा नसणे, सीट बेल्टचा वापर न करणे, तसेच वाहनांवर काळी फिल्म लावणे अशा विविध प्रकारच्या नियमभंगांचा समावेश होता. या कारवाईत एकूण एक लाख २९ हजारांचा ऑनलाइन दंड आकारण्यात आला.
वाहतूक विभागाने स्पष्ट इशारा देत सांगितले की, ओव्हरलोडिंगसारख्या गंभीर प्रकारांना यापुढे कोणतीही मुभा दिली जाणार नाही. या कारवाईनंतर उल्हासनगरातील बिर्ला गेट ते मुरबाड आणि कल्याणदरम्यान धावणाऱ्या ओव्हरलोडेड गाड्या सध्या बंद झाल्या असल्या तरी शहरातील इतर भागांत ही समस्या कायम असल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.