उल्हासनगर, ता. १७ (वार्ताहर) : शहरामध्ये भटक्या श्वानांचा वाढता त्रास आता नागरिकांच्या जीवावर उठू लागला आहे. कॅम्प क्र. ४ परिसरात घडलेल्या एका घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यावर कुत्र्यांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उल्हासनगर शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कॅम्प क्र. ४ मधील साईनाथ नगर, यादव चाळ परिसरात एका एसटी कर्मचाऱ्यावर कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात मनोज भाऊसाहेब मालुंजकर (वय ४०) हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. मालुंजकर हे मुंबई सेंट्रल येथे एसटी महामंडळात कार्यरत असून ते रोजप्रमाणे सकाळी जिमवरून घरी परतत असताना सकाळच्या सुमारास ही घटना घडली. याच परिसरात यापूर्वीही अनेक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावल्याच्या घटना घडल्या आहेत. महापालिकेने तातडीने या समस्येवर नियंत्रण आणावे, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.