मुंबई

पालिका आयुक्तांनी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

CD

कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : सार्वजनिक समस्यांकडे दुर्लक्ष करणे आणि न्यायालयाच्या आदेशांची सतत पायमल्ली करणे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या एका नागरिकाच्या पुनर्वसनप्रकरणी निष्काळजी केल्याबद्दल आणि वारंवार बोलावूनही सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल स्थानिक न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह सात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट न्यायालयाने जारी केले असून, पुढील सुनावणीला त्यांना वैयक्तिकरीत्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

डोंबिवलीतील राजाजी पथ भागात रस्ता रुंदीकरणात इंद्रमणी उपाध्याय नावाच्या नागरिकाचे घर पाडण्यात आले होते. नियमांनुसार, महापालिका प्रशासन बाधित नागरिकाला पर्यायी निवासस्थान देणे किंवा जमिनीचा योग्य आर्थिक मोबदला देणे बंधनकारक होते; मात्र महापालिकेने पीडित कुटुंबाला वाऱ्यावर सोडले, असा दावा करण्यात आला. ​प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे आणि वारंवार विनंती करूनही कोणतीही दखल न घेतल्याने, पीडिताने न्यायासाठी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान महापालिका प्रशासन केवळ समाधानकारक उत्तर देण्यातच अपयशी ठरले नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या समन्सकडे दुर्लक्ष करत सुनावणीला हजर राहणे टाळले होते.

​न्यायालयाने पालिका प्रशासनाच्या या उद्दाम वृत्तीची गंभीर दखल घेत, आयुक्त ​अभिनव गोयल, ​अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त ​वंदना गुळवे, ​प्रसाद बोरकर, शहर अभियंता ​अनिता परदेशी आणि ​नगररचना संचालक संतोष डोईफोडे यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

free Seed Scheme: मोफत बियाण्यासाठी ३०-३५ किमी हेलपाटे; कृषी विभागाच्या भोंगळ नियोजनाने शेतकरी संतप्त, निलंग्यात कृषी विभागाविरोधात नाराजी

Latur Farmer: अधिकारी फोटो काढून गेले अन्... मदतीचा बैलही निघाला आजारी; लातूरच्या शेतकऱ्याच्या दु:खाला अंतच नाही!

Akola News: मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही बुडून मृत्यू; धार्मिक स्नान ठरले अखेरचे, समशेरपूर येथील घटना!

OnePlus Turbo 6X Pro मोबाईलची धमाकेदार एन्ट्री! चक्क 8000mAh एवढी मोठी बॅटरी; लॉन्च होताच डिस्काउंट, किंमत फक्त...

Latest Marathi News Live Update : गर्भवती असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी

SCROLL FOR NEXT