मुंबई

डी. वाय. पाटील अकादमीकडून ३.२३ कोटींची वसुली

CD

डी. वाय. पाटील अकादमीकडून ३.२३ कोटींची वसुली
व्यावसायिक वापरावर कराची कारवाई; मनसेच्या पाठपुराव्यानंतर पालिकेचा निर्णय
जुईनगर, ता. १७ (बातमीदार): नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीवर अनिवासी/व्यावसायिक मालमत्ता कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पालिकेच्या महसूलात मोठी भर पडणार असून, संबंधित संस्थेकडून तब्बल तीन कोटी २३ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात येणार आहे.
नवी मुंबईतील काही खासगी क्रीडा संकुले, स्पोर्ट्स क्लब आणि अकादमींमध्ये सदस्यत्वासाठी नागरिकांकडून लाखो रुपयांची फी आकारली जाते. अशा संस्थांचा वापर पूर्णपणे व्यावसायिक स्वरूपाचा असतानाही काही ठिकाणी निवासी दराने मालमत्ता कर आकारला जात असल्याचा आरोप मनसेने केला होता. त्यामुळे पालिकेचा महसूल बुडत असल्याचे मनसेचे उपशहराध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी निदर्शनास आणून दिले होते.
यासंदर्भात म्हात्रे यांनी आयुक्तांकडे तक्रार दाखल करून संबंधित खासगी क्रीडा संस्थांवर नियमानुसार अनिवासी/व्यावसायिक मालमत्ता कर आकारावा, तसेच भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यापासून आजपर्यंतची थकबाकी वसूल करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी पालिका आयुक्त आणि उपायुक्त यांची वारंवार भेट घेत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवला.
अखेर आयुक्तांच्या निर्देशानंतर मालमत्ता कर विभागाने डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन केले. त्यानुसार संस्थेला अनिवासी/व्यावसायिक कर आकारण्यात आला असून, वार्षिक सुमारे ५१ लाख रुपयांची करवाढ करण्यात आली आहे. तसेच मागील कालावधीतील तीन कोटी २३ लाख रुपयांची थकबाकी निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही काही वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात बोटचेपी भूमिका घेत असल्याचा आरोप सविनय म्हात्रे यांनी केला होता. मात्र, अखेर मनसेच्या दबावानंतर पालिकेने कारवाई करत महसुलात वाढ करणारा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

चौकट
व्यावसायिक वापराबाबत नोटीस
नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये अत्याधुनिक व्यायामशाळा, तरणतलाव, कॅफे, हॉटेल आदी सुविधा उपलब्ध असून, त्यांचा वापर पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने केला जात असल्याचे मनसेने म्हटले आहे. मागील वर्षभरात यासंदर्भात पालिकेकडून सात ते आठ नोटिसा बजावण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

कोट
ही थकबाकी तातडीने वसूल करावी अन्यथा संबंधित ठिकाणे सील करावीत. यावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
- सविनय म्हात्रे, उपशहराध्यक्ष मनसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bills : मत मिळवण्याच्या परिक्षेत मोदी सरकार फेल! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर

Illegal Sand Mining: लांजीत पैनगंगा नदीपात्रात ट्रेझर बोट, जेसीबीने अवैध वाळू उत्खनन; सायफळ घाट बंद तरीही प्रशासन मूकदर्शक

Hormuz Strait Reopens : होर्मुझची सामुद्रधुनी खुली होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, सामान्यांना दिलासा; शेअर बाजारातही उसळी

Akshayy Tritiya 2026 : यंदाच्या अक्षय्य तृतीयेला एक नाही दोन राजयोगांचा धमाका ! 3 राशी होणार अफाट श्रीमंत

मोठी बातमी! LPG वापरकर्त्यांचं संकट संपणार, अखेर होर्मुझची सामुद्रधुनी खुली… इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT