कारवाईनंतरही पत्र्यांच्या, फेन्सिंगच्या आड झोपडपट्ट्या
बेलापूर, ता.१७ (बातमीदार)ः नवी मुंबई शहरातील सुंदरतेला जागोजागी अनधिकृत झोपडपट्ट्यांचा विळखा आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेत अलीकडेच बेलापूर, नेरूळ, सीवूड्स परिसरातील अनधिकृत झोपडपट्ट्या, फुटपाथवरील बेघरांवर कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्या काही भूखंडाना फेन्सिंग, पत्रे लावण्यात आले आहेत. मात्र याठिकाणी पत्र्यांच्या आड पुन्हा झोपडपट्ट्या वसल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा या स्वच्छ करण्यात आलेल्या भूखंडावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
शहरात मोकळे भूखंड दिसले की, त्याठिकाणी अनधिकृत झोपडपट्ट्या बांधकामाचा सुळसुळाट पाहायला मिळतो. मोकळे भुखंड, उड्डाणपुलाखालील परिसर, रेल्वे स्थानक परिसर याठिकाणी बेघर उच्छाद मांडतात. नागरिकांच्या, लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर अलीकडच्या काळात नेरूळ सेक्टर २८, सेक्टर २०, सीवूड्स सेक्टर ४२, रेल्वे परिसरात पालिका आणि सिडको प्रशासनाने कारवाई करत झोपडपट्ट्या जमीनदोस्त केल्या. त्याठिकाणी असलेली घाण स्वच्छ करत भुखंड पुन्हा मोकळे केले. परंतु शासन कारवाईची कोणतीही भीती न बाळगता पुन्हा याठिकाणी बेघरानी उच्छाद मांडण्यास सुरुवातकेली आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता अभियानाला बाधा निर्माण होत आहे. परिणामी शहरातील अनधिकृत झोपड्या मोठी डोकेदुखी ठरत चालल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.