मुंबई विभागाला एक कोटी पुस्तके
बालभारतीकडे मागणी; नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः मुंबई विभागात येणाऱ्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड यासह या जिल्ह्यात येणाऱ्या विविध महापालिकांच्या शाळांना जूनपासून सुरू होणाऱ्या २०२६-२७ या शैक्षणिक सत्रात तब्बल एक कोटी २३ हजार २५३ पाठ्यपुस्तके लागणार आहेत. यासाठी मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण निरीक्षक विभागासह संबंधित महापालिका शिक्षण विभागाकडून ही पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई विभागात येणाऱ्या मुंबई महापालिका, शिक्षण निरीक्षण दक्षिण विभाग, शिक्षण निरीक्षण पश्चिम विभाग, शिक्षण निरीक्षण उत्तर विभाग तसेच रायगड, ठाणे, पालघर, ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, नवी मुंबई महापालिका, भिवंडी-निजामपूर महापालिका आणि मिरा-भाईंदर महापालिका येथील शाळांमध्ये सध्या नोंदणी असलेल्या आणि मोफत पाठ्यपुस्तके सुविधा मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या १३ लाख ९१ हजार ८३४ इतकी आहे. या विद्यार्थ्यांना तब्बल एक कोटी २३ हजार २५३ पाठ्यपुस्तके लागणार असल्याने त्यासाठीची मागणी बालभारतीकडे करण्यात आली आहे.
या मागणीत मुंबई महापालिकेत पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या दोन लाख ८२ हजार ९५४ विद्यार्थ्यांना १७ लाख सात हजार ८९३ इतकी पाठ्यपुस्तके लागणार आहेत, तर दुसरीकडे मुंबई शिक्षण कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण निरीक्षक विभागाच्या तीन उत्तरमधील ५७,७४४, पश्चिममधील ९२,३६८ आणि दक्षिणमधील ७५,३३४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
--
जिल्हा
विद्यार्थीसंख्या
मागणी केलेल्या पाठ्यपुस्तकांची संख्या
मुंबई महापालिका
२,८२,९५४
१,७७,८९३
शि. नि. दक्षिण विभाग
५७,७४४
६,१२,५७१
शि. नि. पश्चिम विभाग
९२,३६८
९,८८,१७२
शि. नि. उत्तर विभाग
७५,३३४
७,८४,६००
रायगड
१,७६,०८८
१५,५२,१७३
ठाणे
१,५१,४८६
१,३३,६०८७
पालघर
२,६४,२५८
२२,७३,६६१
ठाणे महापालिका
६९,०४१
६,६९,५०७
कल्याण-डोंबिवली महापालिका
६४,६१९
६,०८,८६५
उल्हासनगर महापालिका
२५,८५७
१,६२,८९२
नवी मुंबई महापालिका
५९,५९१
३,७०,६५१
भिवंडी-निजामपूर महापालिका
५९,०१२
४,००,३७७
मिरा-भाईंदर महापालिका
१३,४८२
८५,८०६
एकूण
१,३९,१८३४
१,००,२३,२५३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.