मुंबई

नवी मुंबईत वैद्यकीय आरोग्य अधिकारी नियुक्तीवरून वाद

CD

नवी मुंबईत वैद्यकीय आरोग्य अधिकारी नियुक्तीवरून वाद
मनसेचा निषेध, कारवाईची मागणी
तुर्भे, ता. १७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी (MOH) पदाचा प्रभारी कार्यभार डॉ. राजेश म्हात्रे यांना देण्याच्या निर्णयावरून शहरात वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र निषेध व्यक्त करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. विभाग अध्यक्ष सागर विचारे यांनी नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला. निवेदनात डॉ. म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, एका कंत्राटदार संस्थेला ब्लॅकलिस्ट करून काही महिन्यांतच ती कारवाई मागे घेण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
तसेच, एका महिला रुग्णाने उपचारादरम्यान निष्काळजी, मानसिक छळ व अपमानास्पद वर्तन झाल्याचे आरोप केल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. संबंधित घटनेमुळे रुग्णाच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
मनसेने संबंधित अधिकाऱ्याविरोधात फौजदारी कारवाईची मागणी करत वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार तत्काळ रद्द करावा, अशी मागणी केली आहे. सात दिवसांत कारवाई न झाल्यास न्यायालयीन लढा व आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

चौकट
नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
मनसेने नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. कंत्राटदार संस्थेला ब्लॅकलिस्ट करून अल्पावधीतच ती कारवाई मागे घेण्यात आल्याने प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे सत्तेचा गैरवापर आणि मनमानी कारभार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कारवाईसाठी ठोस मागण्या
संबंधित अधिकाऱ्याचा वैद्यकीय अधिकारीपदाचा कार्यभार तत्काळ रद्द करणे, स्वतंत्र चौकशी समिती नेमणे, चौकशीदरम्यान निलंबन करणे आणि फौजदारी गुन्हा दाखल करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच पीडितेला नुकसानभरपाई व संरक्षण देऊन संपूर्ण चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT