मुंबई

ऐरोली नाट्यगृहाला आग

CD

ऐरोली नाट्यगृहाला आग
आगीच्या घटनेतून संशयाचा धूर
वाशी, ता. १७ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेचे ऐरोली सेक्टर-५ येथे नाट्यगृह साकारत आहे. मागील १४ वर्षांपासून रखडलेले नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना शुक्रवारी (ता. १७) आग लागल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. ही आग लागली की लावली?, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेतील विरोधी पक्षाचे गटनेते मनोज हळदणकर यांनी या आगीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नाट्यगृहाची तळमजल्यासह चार मजली वस्तू उभारण्याचे काम सुरू आहे. माजी आमदार संदीप नाईक यांच्या काळात या नाट्यगृहाच्या कामाची महूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र, त्यानंतर १० वर्षे काम रखडले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना रखडलेल्या कामाला गती दिली. मागील चार ते पाच वर्षांपासून या नाट्यगृहाच्या कामाने गती घेतली आहे. ही वस्तू पूर्णपणे साकारत असताना शुक्रवारी तळमजल्याला दुपारी आग लागली. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती महासभा सुरू असताना सदस्यांनी दिली. या आगीच्या घटनेचा अहवाल पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सभागृहापुढे सादर केला. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने चौथ्या मजल्यावर ही आग पोहोचली. घटनेची माहिती मिळताच ऐरोली आणि कोपरखैरणे येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तासात शर्थीचे प्रयत्न करून नियंत्रण मिळवले. त्याचप्रमाणे या आगीत लागलेल्या शंभर कामगार आणि इमारतीच्या टेरेसवर अडकलेल्या दोन कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढले. आग येथे वेल्डिंगचे काम सुरू असल्याने शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागल्याचे आयुक्त डॉ. शिंदे यांनी सभागृहाला सांगितले. या आगीत लाकडी साहित्य, थर्माकोल फोम, सीसीटीव्ही आदी साहित्य जळून खाक झाल्याची माहिती दिली.

चौकशीची मागणी
पालिकेचे विरोधी पक्ष गटनेते मनोज हळदणकर यांनी या आगीवरून संशय व्यक्त केला आहे. शहरातील नाट्यप्रेमींसाठी एवढी मोठी वास्तव बांधण्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. आता कुठे या कामाला गती आल्यानंतर ही आग लागल्याने त्यांनी संशय व्यक्त करीत चौकशी करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal TMC Politics: पश्चिम बंगालमधील राजकीय भूकंपानंतर भाजपने दिली पहिली प्रतिक्रिया; नवीन गट सत्तेत जाणार का?

Solapur MLC Election : सोलापूर विधान परिषदेत मोठा गेम! काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद; एका सहीमुळे संपूर्ण निवडणूक फिरली? फत्तेपूरकरांनी उच्च न्यायालयात घेतली धाव

Baba Vanga Prediction: शेवटच्या ७ महिन्यात 'हे' लोक होणार मालामाल! बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत; कोणत्या राशींना होणार लाभ?

Karad Bridge Opening : पुणे -कोल्हापूर महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज, कऱ्हाडचा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होण्याची तारीख ठरली

'या' आद्याक्षराने नाव सुरु होणारे लोक असतात स्वतःच्या मर्जीचे मालक ! अत्यंत हुशार आणि श्रीमंत होणारे लोक

SCROLL FOR NEXT