मुंबई

उल्हासनगरात वाहनांची तोडफोड

CD

उल्हासनगरात वाहनांची तोडफोड

उल्हासनगर, ता. १७ (वार्ताहर) : उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक २ परिसरात गुरुवारी (ता. १६) मध्यरात्री अचानक उसळलेल्या वादामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. चेहऱ्यावर रुमाल बांधलेल्या अज्ञात इसमांनी परिसरातील गाड्यांची तोडफोड करत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे बॅनर फाडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

टेलिफोन एक्स्चेंज समोरील राहुल नगर परिसरात हा प्रकार घडला. अज्ञात तीन ते चार जणांनी दहशत माजवत दुचाकी व रिक्षांची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञातांनी अचानक परिसरात प्रवेश करून चार ते पाच दुचाकी आणि एका रिक्षाचे नुकसान केले. याशिवाय प्रवेशद्वारावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा बॅनर फाडण्यात आला. आवाज ऐकून बाहेर आलेल्या रहिवाशांना आरोपींनी धारदार शस्त्र दाखवत धमकावले आणि घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेनंतर संतप्त नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि मध्यरात्री ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी व वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT