थोडक्यात
कोपरखैरणेत अक्षय्य तृतीयेला हिंदू संमेलन
तुर्भे, ता १७ (बातमीदार): कोपरखैरणे सेक्टर ११ व १२ बोनकोडे परिसरात हिंदू संमेलन आयोजन समितीची नियोजन बैठक झाली. या बैठकीत १९ तारखेला अक्षय्य तृतीया निमित्त हिंदू संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपदी श्रीहरी पवळे, उपाध्यक्षपदी नयना शेट्टी, प्रकाश थोरात व अजित चोरगे यांची निवड झाली. सचिवपदी सुनील पाटील, तर कोषाध्यक्षपदी प्रमोद जांभळे व भालजी चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली. सांस्कृतिक प्रमुख अंबादास कोटा असून प्रसार व परवानगीची जबाबदारी कल्याणी साळुंखे व अतुल देशमुख यांच्याकडे देण्यात आली. सायंकाळी ४ ते ८ दरम्यान शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, मार्गदर्शन, भजन संध्या व प्रसाद वितरण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
----------------------------------------------------
स्थायी समितीत १० कोटींच्या विकासकामांना मंजुरी
वाशी, ता. १७ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहराच्या विकासासाठी सुमारे १० कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला.
ऐरोलीतील दिवा गाव परिसरात गटार व पदपथ सुधारणा, तुर्भेतील इंदिरानगर येथे रस्त्यांचे काँक्रीटीकरण व ड्रेनेज कामांना मंजुरी देण्यात आली. बेलापूरमधील सीबीडी परिसरात इमारतीवर डिझायनर रूफ बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. वाशी सेक्टर १६ मध्ये नवीन मलनिस्सारण वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. याशिवाय तुर्भेतील कोपरी गाव, सानपाडा सेक्टर २० आणि नेरुळ सेक्टर ४८ येथे पदपथ व ड्रेनेज सुधारणा करण्यात येणार आहे. कोपरखैरणे येथील महापालिका शाळा क्रमांक ९४ साठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला. या कामांमुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.
------------------------------------------------------------------------
उलवे येथे रक्तदान शिबिर
उलवे, ता. १७ (बातमीदार) : सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या उद्देशाने अनिरुद्ध अकादमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट, सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र (गव्हाण, कोपर, उलवे व करंजाडे) यांच्या संयुक्त विद्यमाने २६ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत कोपर तलाव, सेक्टर ०९, बोरकर क्लिनिकसमोर, उलवे येथे होणार आहे. या उपक्रमासाठी अरुण ओवलेकर व निलेश ओवलेकर समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. रक्तदानामुळे अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया व विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना मदत होते. त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जात असून समाजासाठी अशा शिबिरांचे मोठे महत्त्व आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.