मुंबई

पश्चिम, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

CD

पश्चिम, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

प्रवाशांचे होणार हाल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. १९) हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर  मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या पनवेल  ते वाशीदरम्यान दाेन्ही दिशांकडील मार्गांवर, तर पश्चिम रेल्वेवर  सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
------------
हार्बर रेल्वे
कुठे :  पनवेल -वाशी  अप आणि डाऊन हार्बर मार्गावर

कधी : सकाळी ११.०५  ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी आणि सीएसएमटीहून पनवेल/बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लाेकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल-ठाणे लाेकल सेवा रद्द राहणार आहेत. यादरम्यान सीएसएमटी ते वाशी विशेष गाड्या धावतील, तर ट्रान्स हार्बर मार्गावर  ठाणे-वाशी/नेरूळ अशा लाेकल चालवण्यात येणार आहेत.
--------------
पश्चिम रेल्वे
कुठे :   सांताक्रूझ  गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर
वेळ : सकाळी १० ते  दुपारी ३ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत  सांताक्रूझ आणि  गोरेगाव  स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व सेवा धीम्या मार्गावर चालवल्या जाणार आहेत. याशिवाय  ब्लॉकदरम्यान काही उपनगरी गाड्या रद्द राहणार आहेत. काही जलद लोकल सेवा हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत चालविण्यात येणार आहेत.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर! आता 'या' सेलिब्रिटींवरही कारवाई होणार, एफडीएचं मोठं पाऊल; नेमकं प्रकरण काय?

Kolhapur Bribery Case : बदलीसाठी शिक्षकाकडून २५ हजार घेताना शिक्षण अधिकारीला टपरीवर अटक, कोल्हापुरात लाचलुचपतची मोठी कारवाई

बाबो...! प्रग्नेंसीनंतरही कतरिनाचे केस इतके लांब अन् घनदाट कसे? 'हे' आहे तिच्या केसांचं सिक्रेट

Sanjay Raut Statement : तर मी भाजपात जाईन, संजय राऊतांच्या वक्तव्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या

Latest Marathi News Live Update : काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

SCROLL FOR NEXT