Kolhapur Bribery Case : बदलीसाठी शिक्षकाकडून २५ हजार घेताना शिक्षण अधिकारीला टपरीवर अटक, कोल्हापुरात लाचलुचपतची मोठी कारवाई

ACB Raid Kolhapur : शिक्षकाच्या बदलीसाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षण अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोल्हापुरात रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
Kolhapur Bribery Case ACB Raid

Kolhapur Bribery Case ACB Raid

esakal

Updated on

Education Officer Arrested : थकीत पगार आणि पगाराचा फरक काढण्यासाठी २५ हजारांची लाच घेतल्या प्रकरणी महापालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रभारी प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार (वय ५२, रा. खामकर गुरुजी कॉलनी, वाशी नाका) याला आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. शिवाजी मार्केट परिसरातील चहा टपरीजवळ ही कारवाई झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com