राज्यात गेलचे १०० मेगावॉटचे सौरप्रकल्प
५५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : गॅस क्षेत्रात कार्यरत असलेल्या गॅस अथाॅरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) तब्बल ५५० कोटी रुपये खर्चून महाराष्ट्रात १०० मेगावाॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. त्याबाबतची माहिती गेलने शेअर बाजारात दिली आहे. गेलच्या या सौरऊर्जा प्रकल्पामुळे राज्यातील हरित ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढणार आहे.
औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणात कोळसा जाळावा लागत असल्याने प्रदूषण होते. त्यापार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारकडून सौर, पवन अशा हरित ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानुसार गेल इंडियाकडून महाराष्ट्रात संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे १०० मेगावाॅट क्षमतेचे सौरप्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासोबत बॅटरी स्टोरेज प्रणाली उभारली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पात तयार होणारी वीज गरजेनुसार वापरता येणार असून, मागणी कमी असताना बॅटरीच्या माध्यमातून स्टोरेज करून ठेवता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.