अपघातप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा
वाडा, ता. १८ (बातमीदार) ः वाडा-मनोर महामार्गावरील वरले गावाजवळ खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी इगल कंपनीवर हलगर्जीचा ठपका ठेवून वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील आलमान येथील रमेश पवार (४६) हे शुक्रवारी (ता. १७) दुचाकीवरून जाताना हा अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी इगल कंपनीचे मालक, व्यवस्थापक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना एक कोटीची मदत देण्याची मागणी काॅंग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी वाडा पोलिस ठाण्यात एका तक्रारीद्वारे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.